+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustऐन दिवाळीच्या तोंडावर टिप्पर चालकांचा गेल्या महिन्यातील पगार न झाल्याने कर्मचारी हवालदील adjustविधानसभा निवडणूक 2024 : कोल्हापूर जिल्ह्यात 10 विधानसभा मतदारसंघात मंगळवारी दि.29 ऑक्टोबर रोजी एकूण 131 उमेदवारांनी 188 उमेदवारी अर्ज दाखल; शेवटच्या दिवसाखेर जिल्ह्यात 10 जागांसाठी 221 उमेदवारांनी एकुण 324 उमेदवारी अर्ज दाखल adjust कोल्हापूर जिल्ह्यातील 3 हजार प्राथमिक व 2 लाख 51 हजार माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी पत्र लेखनातून केले पालकांना मतदानाचे आवाहन adjustशिवाजी विद्यापीठाचा भारतीय वायू दलासमवेत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार; अधिकारी, जवानांना उच्चशिक्षण घेण्याची संधी मिळणार adjustकोल्हापूर महानगरपालिकेतर्फे मतदान जनजागृतीचे स्टिकर्स देऊन दीपावलीच्या शुभेच्छा adjustकोल्हापूर महानगरपालिका : प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या 7 व्यापाऱ्यांकडून 45 हजार रुपये दंड वसूल adjustकोल्हापुरात दिवाळी खरेदीसाठी रस्ते गर्दीने फुलले; खरेदीचा उत्साह शिगेला! adjustकळंबा मध्यवर्ती कारागृहातील बंदी निर्मित वस्तुंच्या प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते उद्घाटन adjustकोल्हापूर जिल्ह्यात 12 नोव्हेंबरपर्यंत बंदी आदेश लागू adjustडीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी बनविले दिपावलीसाठी ‘प्लॅस्टीक बॉटल व प्लॅस्टीकच्या चहाच्या कपापासून आकाशकंदील व इतर साहित्य’, नैसर्गिक स्त्रोताचा वापर करुन दिवाळी साजरी करण्याचे विद्यार्थ्यांचे अवाहन
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule29 Oct 24 person by visibility 244 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सिस्टॅमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉन पार्टिसिपेशन स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रात 274 दक्षिण व 276 उत्तर मतदारसंघ नोडल ऑफिसर तथा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. यासाठी सब नोडल ऑफिसर तथा वरिष्ठ लेखापरीक्षक वर्षा परीट यांच्या नियंत्रणाखाली शहरातील वेगवेगळ्या आस्थापनाना, मॉल, मोठे बझार या ठिकाणी दीपावलीच्या शुभेच्छा म्हणून मतदान जनजागृतीचे स्टिकर्सद्वारे वाटप करण्यात आले. या योजनेमध्ये महानगरपालिकेतील परवाना, अतिक्रमण, घरफाळा विभाग व सर्व विभागीय कार्यालयांनी ही स्टिकर्स वाटप करण्यात सहभाग घेतला. यामध्ये प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी मतदारांना " 20 नोव्हेंबरला मतदान करा लोकशाहीची दिवाळी साजरी करा " असा दीपावलीचा शुभ संदेश दिला.

या उपक्रमाअंतर्गत उपायुक्त पंडित पाटील यांनी विविध आस्थापनांना प्रत्यक्ष भेट देवून मतदान करण्याबाबत आवाहन केले. शहरातील बाजार पेठेतील हमाल, ट्रॅफिक पोलिस यांनाही मतदान जनजागृती व दिपावली शुभेच्छा यावेळी दिल्या. तसेच महानगरपालिका आवारात मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनीही आपल्या गाडीवर स्टिकर लावून स्टाफ सोबत शपथ घेतली. यावेळी सर्व फायरच्या गाड्यांवरती दीपावलीच्या शुभेच्छांचे स्टिकर लावण्यात आले. शहरातील विविध आस्थापनांनी याची दखल घेऊन या उपक्रमास उत्कृष्ट प्रतिसाद दिला.

या उपक्रमामध्ये मतदार संघ 274 कोल्हापूर दक्षिण नोडल ऑफिसर तथा मुख्यलेखापाल संजय सरनाईक, मतदार संघ 276 कोल्हापूर उत्तर नोडल ऑफिसर नेहा अकोडे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, परवाना विभाग अधीक्षक अशोक यादव, अतिक्रमण विभाग प्रमुख विलास साळोखे व इतर अधिकारी यांनी सहभाग नोंदवला.