+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustऐन दिवाळीच्या तोंडावर टिप्पर चालकांचा गेल्या महिन्यातील पगार न झाल्याने कर्मचारी हवालदील adjustविधानसभा निवडणूक 2024 : कोल्हापूर जिल्ह्यात 10 विधानसभा मतदारसंघात मंगळवारी दि.29 ऑक्टोबर रोजी एकूण 131 उमेदवारांनी 188 उमेदवारी अर्ज दाखल; शेवटच्या दिवसाखेर जिल्ह्यात 10 जागांसाठी 221 उमेदवारांनी एकुण 324 उमेदवारी अर्ज दाखल adjust कोल्हापूर जिल्ह्यातील 3 हजार प्राथमिक व 2 लाख 51 हजार माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी पत्र लेखनातून केले पालकांना मतदानाचे आवाहन adjustशिवाजी विद्यापीठाचा भारतीय वायू दलासमवेत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार; अधिकारी, जवानांना उच्चशिक्षण घेण्याची संधी मिळणार adjustकोल्हापूर महानगरपालिकेतर्फे मतदान जनजागृतीचे स्टिकर्स देऊन दीपावलीच्या शुभेच्छा adjustकोल्हापूर महानगरपालिका : प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या 7 व्यापाऱ्यांकडून 45 हजार रुपये दंड वसूल adjustकोल्हापुरात दिवाळी खरेदीसाठी रस्ते गर्दीने फुलले; खरेदीचा उत्साह शिगेला! adjustकळंबा मध्यवर्ती कारागृहातील बंदी निर्मित वस्तुंच्या प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते उद्घाटन adjustकोल्हापूर जिल्ह्यात 12 नोव्हेंबरपर्यंत बंदी आदेश लागू adjustडीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी बनविले दिपावलीसाठी ‘प्लॅस्टीक बॉटल व प्लॅस्टीकच्या चहाच्या कपापासून आकाशकंदील व इतर साहित्य’, नैसर्गिक स्त्रोताचा वापर करुन दिवाळी साजरी करण्याचे विद्यार्थ्यांचे अवाहन
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule29 Oct 24 person by visibility 220 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यात यात्रा, सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत तसेच विविध पक्ष संघटना यांच्याकडुन त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलने करण्यात येतात. तसेच विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाली असून दि. 22 ऑक्टोबर पासून उमेदवारांचे नामनिर्देशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्या अनुषंगाने विविध पक्षाकडून रॅली, सभेचे आयोजन करण्यात येत आहे. या दरम्यान दोन पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोरासमोर येवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

 यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1), (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) नुसार जिल्ह्यात दिनांक 30 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 12 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे.

हा हुकूम सरकारी अधिकारी/कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविणेचे संदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात, आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतली आहे. अशा व्यक्तींना, तसेच सर्व जाती धर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रा, इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही.