+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule03 Aug 24 person by visibility 463 categoryक्रीडा
कोल्हापूर : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्य पदक मिळवलेल्या स्वप्नील कुसाळे याच्या यशाबद्दल आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या रकमेचा धनादेश आमदार ऋतुराज पाटील यांनी आज कांबळवाडी (ता. राधानगरी ) येथील त्याच्या घरी जाऊन वडील सुरेश कुसाळे व आई कांबळवाडीच्या लोकनियुक्त सरपंच अनिता कुसाळे यांच्याकडे सुपूर्द केला. 

आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले की, स्वप्निलचे हे यश अनेक युवकांना प्रेरणादायी आहे. स्वप्निलच्या आई-वडिलांनी केलेले कष्ट आणि समर्पणही फार महत्त्वाचे आहे. यापुढेही स्वप्निल आपल्या खेळातून देशाचे नाव आणखी उज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला .

यावेळी स्वप्निलचे वडील सुरेश कुसाळे यांनी स्वप्नीलचा जिद्द, चिकाटी, नम्रता, मेहनत आणि संघर्षपूर्ण प्रवास उपस्थितांसमोर मांडला. देशासाठी पदक जिंकल्यानंतर स्वप्निलने घरच्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधल्यानंतरचा भावुक प्रसंगही त्यांनी सांगितला. 

 याप्रसंगी जि. प. सदस्य पांडुरंग भांदिगरे, मोहन धुंदरे, सतीश बरगे सर , स्वप्निलचे काका शिवाजीराव कुसाळे, भाऊ सुरज कुसाळे, आजी - आजोबा यांच्यासह कुसाळे कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते.