SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात फुटपाथवरील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई सुरुकोल्हापूर शहरातील भटके कुत्रे शेल्टर उभारणीसाठी महापालिकेच्या वि. स. खांडेकर शाळेत प्राणीप्रेमींची बैठक संपन्नकोल्हापूर प्राधिकरणाला 'विशेष नियोजन प्राधिकरण' दर्जासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर; ४२ गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार - पालकमंत्री प्रकाश आबिटकरविधिमंडळ हिवाळी अधिवेशन-2025 'दूरध्वनी पुस्तिके'चे माहिती विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते प्रकाशन, क्यू. आर. कोडमुळे डिजिटल पुस्तिका सहज उपलब्धसतेज कृषी प्रदर्शनात चार दिवसात ११ कोटींची उलाढाल, तांदळासह शेती औजारे धान्याची उच्चांकी विक्रउज्ज्वल कोल्हापूर संघटनेच्या वतीने औद्योगिक कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भात निवेदनबांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये नोकरीची संधीलक्ष्मीपुरी पोलीस लाईनच्या बांधकामामुळे ड्रेनेज लाईनची दुरवस्था नेहरू हायस्कूल परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता, विद्यार्थ्यांच्या आरोग्यास गंभीर धोकामाती व माणसाचे आरोग्य आधुनिक तंत्रज्ञानाने दर्जेदार करणे ही काळाची गरज : डॉ. चंद्रशेखर बिरादर; राष्ट्रीय स्तरावरील ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन’ स्पर्धेचे केआयटीत दिमाखदार उद्घाटनसंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलतर्फे “देशी झाडांचे वृक्षारोपण"

जाहिरात

 

कोल्हापूर शहरातील भटके कुत्रे शेल्टर उभारणीसाठी महापालिकेच्या वि. स. खांडेकर शाळेत प्राणीप्रेमींची बैठक संपन्न

schedule08 Dec 25 person by visibility 49 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : सर्वोच्च न्यायालयाच्या SUO MOTO Writ Petition (Civil) No. 5 of 2015 मधील 07 नोव्हेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार तसेच नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई यांच्या 18 नोव्हेंबर 2025 रोजी आलेल्या निर्देशांनुसार शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणांवरून भटके कुत्रे शेल्टरमध्ये स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या निर्देशांनुसार शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, दवाखाने, क्रीडासंकुले, बसस्थानक, रेल्वेस्टेशन, धार्मिक स्थळे, हेलीपॅड, विमानतळ आदी ठिकाणांवरील भटके कुत्रे सुरक्षित शेल्टरमध्ये नेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भारतीय प्राणी कल्याण मंडळाने शेल्टर व्यवस्थापनासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यानुसार महानगरपालिका शेल्टर उभारण्याचे काम हाती घेणार आहे. हे शेल्टर प्रभावीपणे चालवण्यासाठी नागरिक व प्राणीप्रेमी यांच्या सहकार्याची गरज आहे.

यासंदर्भातील चर्चा व नियोजनासाठी आज सोमवार, दि. 08 डिसेंबर  रोजी दुपारी 12.30 वा. प्रतिभानगर येथील वि. स. खांडेकर शाळेत बैठक संपन्न झाली. 

या बैठकीत सर्व प्रथम कोल्हापूर महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करुन मा.सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोणकोणती कार्यवाही करावी याबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर उपस्थित सर्व प्राणी प्रेमी व नागरीकांनी याबाबत आपले मत व्यक्त करुन शेल्टर संदर्भात महत्वपुर्ण सूचना केल्या. तसेच कोल्हापूर महानगरपालिका आवश्यक ते सहकार्य करणेचे नमूद केले. सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शनचे डॉ.चंग्रहास कापडी यांनी शस्त्रक्रिया व लसीकरणबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. राहूल चिकोडे यांनी प्राणीप्रेमी, सेवाभावी संस्था व लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडवता येईल असे सांगितले. तसेच शहराच्या हद्दीलगतच्या ग्रामपंचायती यांचा सहभाग आवश्यक असून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही या कामात घेणार असलेचे सांगितले. त्याचप्रमाणे उपस्थित प्राणीप्रेमी यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांना खाद्य घालण्याची परवानगी अर्जास मुदतवाढ देण्याची विनंती केली. 

उप-आयुक्त परितोष कंकाळ यांनी महापालिका याबाबत ठोस उपाययोजना करत आहे. यास प्राणी प्रेमींनी व नागरीकांनी सहकार्य करावे तसेच महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणारे शेल्टरमध्ये प्राणी प्रेमींमार्फत खाद्य पुरवठा करावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्राणीमित्र ॲड.बधे, ॲड.माधुरी म्हेत्रे, दिपक मिसाळ, कल्पना भाटीया, प्रशांत साठे, संयोगीता माने, कोमल पोतदार व इतर प्राणी प्रेमी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes