सतेज कृषी प्रदर्शनात चार दिवसात ११ कोटींची उलाढाल, तांदळासह शेती औजारे धान्याची उच्चांकी विक्र
schedule08 Dec 25 person by visibility 89 categoryउद्योग
🔸आजरा घणसाळ,आजरा इंद्रायणी तांदळाला भरघोस मागणी
🔸चार दिवसात गर्दीचा अक्षरशः महापूर , प्रदर्शन स्थळी लोटला जनसागर
🔸प्रदर्शनाच्या आज शेवटच्या दिवशी खरेदीसाठी ग्राहक शेतकऱ्यांची झाली होती प्रचंड गर्दी
🔸सांगोला सोलापूर येथील विठ्ठल नामदेव पवार कडलास खिलार जातीचा खोंड चॅम्पीयन ऑफ द शो ठरला आहे. जगातील बुटकी मुरा रेडी बेस्ट ऑफ द शो ठरली.
कोल्हापूर : कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे आयोजित सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला चार दिवसात ९ लाख शेतकरी, नागरीक व ग्राहकांनी भेट दिली. आणि शेतीविषयक योजनांची माहिती घेऊन शेतीला लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली. दरवर्षी भरघोस प्रतिसाद मिळणाऱ्या या सत्तेज कृषी प्रदर्शनात चार दिवसात तब्बल दहा कोटींची उलाढाल झाली आहे.
या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती विषयी प्रचंड माहिती आणि मार्गदर्शन मिळते. आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी शेती साठी लागणारे साहित्य आणि माहिती मिळावी या उद्देशानेच सहा वर्षांपूर्वी कृषी प्रदर्शनास सुरुवात केली यावर्षी २०२५ सालचे प्रदर्शन हे सातवे प्रदर्शन आयोजित केले होते.आज शेवटच्या दिवशी सोमवारी तपोवन मैदानावर जनसागर लोटला होता.चार दिवसात तांदळाची उंच्चांकी विक्री झाली असून ७० लाख पेक्षा अधिक उलाढाल ही तांदूळ मधून झाली आहे.महिलां बचत गटांच्या खाद्य पदार्थ स्टॉलच्या माध्यमातून ६० लाखांची उलाढाल झाली आहे.तर शेतीसाठी लागणारी मोठी यंत्रे,व अवजारे खरेदी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रदर्शनात सांगोला सोलापूर येथील विठ्ठल नामदेव पवार कडलास खिलार जातीचा खोंड चॅम्पीयन ऑफ द शो ठरला आहे. जगातील बुटकी मुरा रेडी बेस्ट ऑफ द शो ठरली.
सेंद्रिय गुळाचीही उच्चांकी खरेदी झाली.
शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी आमदार सतेज पाटील यांनी गेली ६ वर्षांपासून या पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा "सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाची सुरुवात केली.यावर्षीचे हे ७ वे प्रदर्शन ५ डिसेंबर रोजी सुरू झाले आज याची ८ डिसेंबर रोजी सांगता अभूतपूर्व गर्दीत झाली. चार दिवसात
कोल्हापूरसह,सांगली,सातारा, सोलापूर, कर्नाटक,कोकण इचलकरंजी व कोल्हापूर जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी प्रचंड गर्दी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती उपयुक्त साहित्य खरेदीसाठी केली होती. देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचे अडीचशे हून अधिक स्टॉल, २५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यां सहभागी झाल्या होत्या.त्या कंपन्यांची उत्पादने, अन्य पशुपक्षी,जनावरे, विविध शेतीला लागणारी अवजारे, बी बियाणे, खते प्रदर्शनात शेतकऱ्यानी पिकविलेला विविध प्रकारचा तांदूळ, विदेशी भाजीपाला, कोल्हापूर जिल्ह्यात पिकविण्यात आलेला भाजीपाला, स्थानिक फुले,ऊस पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी व शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.
यावेळी बोलताना हवामान तज्ञ पंजाब डक यांनी बदलत्या हवामानाविषयी सविस्तर माहिती दिली पाऊस ऊन वारा या सर्व ऋतूमध्ये शेतकऱ्यांनी शेतीची कोणती काळजी घ्यावी शेती कशाप्रकारे करावी त्याची राखण कशी करावी आणि पिके कधी काढावीत याची सविस्तर माहिती दिली. बदलत्या वातावरणामुळे शेतीवर होणारा परिणाम आणि त्यापासून कसे संरक्षण घ्यायचे याचेही मार्गदर्शन केले. निसर्गाला चाहूल आधीच लागते प्राणी आणि पशुपक्षी याबद्दल माहिती देत असतात त्याचे ज्ञान आपल्याला असणे आवश्यक आहे आणि आपण निसर्गाचे संकेत ओळखणे गरजेचे आहे असे विचार मांडले.
यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी बोलताना कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती विषयक माहिती देण्याचे काम गेली सात वर्षापासून सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून केले जात आहे पुढेही हे प्रदर्शन नव्या पद्धतीने शेतकऱ्यांसमोर येईल शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद दिला मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यापुढेही सतेज कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना निश्चितच दिशा देत राहील असे उद्गार काढले.
कृषी विभागाच्या वतीने कृषी ॲप तयार केला आहे ते ॲप कसे वापरायचे त्याचा उपयोग काय याची माहिती कृषी प्रदर्शनामध्ये दिली गेली आणि शेतकऱ्यांकडून रजिस्ट्रेशन करून घेतले आहे. शेतकऱ्यांचा फार्मर आयडी म्हणजेच त्यांचे रजिस्ट्रेशन करून तो आयडी या ठिकाणी काढून दिला गेला आहे. हा आयडी शेती विषयक कामासाठी व प्रशासकीय कामासाठी उपयोगी पडणार आहे.कृषी प्रदर्शनानंतर ज्या शेतकऱ्यांना हा कोड आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून रजिस्ट्रेशन करून काढून दिला जाणार आहे.
कोल्हापुरातील मंदार इंगवले यांचा क्राउड किंग नावाने परिचित असलेला कोल्हापूरकरांचा भुत्या हा घोडा जो आंघोळ घातल्यानंतर ओला झाल्यावर काळा दिसतो आणि वाळला की पांढरा दिसतो.शिवाय कागल मधील हैदर अली यांचा ब्रँड ब्रिडिंग फार्म मांडण्यात आली आहे.ज्यात पांढरे रंगीबेरंगी,कबुतरे,ससे,मांजर,बदक,पांढरे उंदीर राजहंस,लवबर्ड,पोपट आदी जनावरे प्रदर्शनात आली आहेत. ब्ल्यू गोल्ड मकाऊ एक वर्षाचा आहे जो प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरली.
शिवाय कागल येथील हैदर भाई फार्म अमेरीकन १८ इंचाची बिल्टन बोकडे, टर्की कोंबडी बदक व्हाईट पीकॅन बदक, हेमस्टर जातीचे पांढरे उंदीर,हेज टॉग पांढरा उंदीर,
टर्की कोंबडा,प्रदर्शनाचे ठरत आहे. सातार्डेकरांचा साडेचार वर्षाचा सुंदर बैल, हसुर बुद्रुक येथील दिनकर शेळके यांचा निवर्गी वळू,गोल्डन कुत्रा, कोल्हापूरचा भुत्या घोडा, एक टनाचा २७ महिन्याचा पांडुरंग बोटे हसुर बुद्रुक यांचा
एक टनाचा कानाच्या पुढे वळलेल्या शिंगांचा जाफराबादि सुलतान रेडा, सुंदर बैल,एक टनाचा खुपिरे अमर आप्पाजी केंबळेकर यांचा भैरु रेडा
२८ महिन्याचा कोतोलीकरांचा लाडका सोन्या बैल प्रदर्शनाचे ठरले आकर्षण.
याचबरोबर विदेशी आणि स्वदेशी भाजीपाला हेरले येथील आदर्श चौगुले यांचा १० किलोचा भोपळा १५ किलोचा कोहळा, सुरण, काटेरी केळफुल, ईश्वर फुल, माऊंटन पपई बेल वांग मागची ढबू मिरची, कौलगेची शिमला मिरची, हळद कडगावचे बंपर फळ संकेश्वरी मिरची, १८ इंची लाल हिरवी मिरची, राधानगरी ठीकपुरलीची चेरी टोमॅटो अर्धा किलोचा बंपर, रानकेळी, राधानगरी येथील लाल केळी, दिंडनेर्ली करवीरची एकाच झाडाला चार किलो लागलेली हिरवी देशी मिरची, तीन किलोचा भोपळा, २० किलो वजनाचा नागदेववाडी येथील प्रताप चिपळूणकर यांचा केळीचा घड,साडेचार फूट लांब निशिगंध असलेले फुलाचे रोप सतेज कृषी
प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहे.लांब पपई आणि पाच किलो वजनाचा मोठा कोबी,शिरोळ येथील हिरवीगार वांगी कारली. शिरोळ येथील तानाजी इंगळे यांची झुकिनी भाजी,वाकरे येथील विशाल जनार्दन पाटील यांचा अडीच किलो वजनाचा दुधी भोपळा, गगनबावडा तालुक्यातील मांडूकली खोपडेवाडी येथील पुनाखिरी म्हणजेच पुना काकडी,आदी भाज्या पहावयास मिळाल्या. जरबेरा फुले निशिगंध प्रदर्शनाचे ठरत आहेत आकर्षण याचबरोबर विविध कँपन्यांची उत्पादने विविध प्रकारची ट्रॅकटर्स मांडण्यात आली होती.त्यांचीही मोठी खरेदी झाली.
स्थानिक भाज्यासह विदेशी भाजीपाला पहावयास मिळत आहे.भाज्यांमध्ये फळ,वांगी,टोमॅटो,शेंग,मिरची,दुधी भोपळा,मोठा भोपळा,हळद,धान्य,लसूण, शिरोळ कोंडीग्रे येथील हिरवी कारली, शिरोळ कुटवाड येथील काजल काकडी, विदेशी भाजीपाला मध्ये फायजिली सॅलरी, सॅमसंग, ब्रोकोली. अडीच फूट लांब अन्नपूर्णा पाने खास आकर्षण ठरली. समारोप प्रसंगी पंजाबराव डक हवामान तज्ञ माजी आमदार ऋतुराज पाटील, बसवराज मास्तोळी सहयोगी संचालक, कृषी विकास अधिकारी जालिंदर पांगरे डॉ. सुनील कराड नामदेव परीट, अरुण भिंगारदिवे,राजेश कांबळे, डॉ विद्या सागर गेडाम, डॉ अशोक पिसाळ
गोकुळ संचालक बाबासाहेब चौगुले, बायाजी शेळके, आत्मा प्रमुख रक्षा शिंदे, प्रमोद बाबर, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब देवकर, जयवंत जगताप, सुयोग वाडकर, डॉ,सुनील काटकर, आर.एस.कांबळे,कृषी प्रदर्शन संयोजक विनोद पाटील,धिरंज पाटील, स्वप्नील सावंत डॉ.अशोक पिसाळ आदींच्या उपस्थितीत विजेत्यांचा प्रशस्तीपत्र व ट्रॉफी व रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
🔸आदत खिल्लार कालवड
1 संजय केरबा गवळी बोरीवडे पन्हाळा
2 सुजल सुरज भोजकर तळदंगे तालुका हातकणंगले द्वितीय
3 राहुल बाळासाहेब इंगळे कवढळी पंढरपूर सोलापूर
🔸गट : दोन दाती खिल्लार कालवड
जात: खिलार
1 तुशार संजय वळगट्टे कंडगाव
2 राजवर्धन सरदार पाटील माजगांव पन्हाळा
3 ज्योतिराम दिनकर शेळके सातार्डे पन्हाळा
🔸गट : चार दाली खिलार कालवड जात: खिलार
1 कृष्णात श्रीमंत भस्के नांदगाव मोहोळ सोलापूर
2 सौरभ संजय पाटीलशंकरवाडी कागल
3 सोहम शिवाजी पाटील कोतोली पन्हाळा
▪️गट : खिलार गाय
1 चंद्रकांत अशोक शिरोळे तळदंगे
2 शामराव भिभराव नागरिळक पंढरपूर
3 भारुती डिल्लू पाटील फराळे राधानगरी
🔸गट : अदात खिलार खोंड
1 नवनाथ बाळासाहेब इंगवले कडलास सांगोला सोलापूर
2 संजय केरबा गवळी बोरिखडे पन्हाळा कोल्हापूर
3 कृष्णात श्रीमंत मस्के नांदगाव मोहोळ सोलापूर
🔸गटः चार दाती खिलार खोंड
1 तानाजी रामचंद्र पाटील कोतोली पन्हाळा
2 तानाजी साताऱ्या वारके मजरे कासारवाडा
3 तानाजी साताचा वारके मजरे कासारवाडा
🔸गट : सहा दाती खिलार खोंड
1 बजरंग मारूती चरिट अंकोले भोहोळ सोलापूर
2 सतिश आधासो होडे हुपरी पन्हाळा कोल्हापूर
3 ज्योतिराम दिनकर शेळके सातार्डे पन्हाळा
🔸गट : पुर्ण दाती खिलार नर
1 श्रवण कालिदास पाटील विखडे बुद्रुक मोहोळ सोलापूर
2. सागर विलास पाटील नेर्ली करवीर
3 संतोष शामराव वेटाळे कसबा बावडा
🔸गट : गुहा रेडा
1 स्वप्निल अशोक पोवार हसुरचपू
2 पांडूरंग गुंडू बोटे हसुर चंपू
🔸मुऱ्हा रेडी
1 जयसिंग केरबा खामकर कसबा बावडा
2 आकाश हंबीर सुतार का।. बावडा
🔸गट : मुन्हा म्हैस
1 अविनाश संजय केंबळे कसबा . बावडा
🔸गट : पंढरपुरी रेडा
1 भिभराव सतू पाटील नंदवाळ
2 अभर आप्पाजी केंबळेकर खुपिरे
🔸गट : पंढरपुरी म्हैस
1 जगन्नाथ रामचंद्र देवकर येल्लूर सांगली
2 अशितोष प्रकाश मोरे ओरेवाडी करवीर
🔸गट : पंढरपुरी रेडी
1 यशराज किशोर खामकर कसबा बावडा
🔸गट : जाफराबादी रेडा (सुलतान रेडा)
1 फिरोज सरदार शेख करनूर कागल कोल्हापूर
🔸वैशिष्यपूर्ण (बुटकी) मुन्हा रेडी
1 अनिकेत त्र्यबक बोराटे मलवडी माण सातारा
🔸गट : गिर कालवड
1 अवधूत संदिप पाटील वाशी करवीर
🔸गट : गिर गाय
1 संदिप बळीराम पाटील वाशी करवीर कोल्हापूर
🔸गट : पुंगणूर गाय
जान : पुंगणूर
1 रितेश काशिनाथ जाधव वडणगे करवीर कोल्हापूर
🔸गट : संकरित गाय वर्ग
1 पृथ्वीराज गणपती नेरे बच्चे सावर्डे पन्हाळा
2 ओंकार सुनिल पाटील बच्चे सावर्डे पन्हाळा
🔸गट अश्व वर्ग (घोडा)
1 बाळूमामा देवालय रुकडी कोल्हापूर
2 आसिफ अल्लाबक्ष बागवान लक्षतीर्थ वसाहत
3 दिपक डिग्रजे रुकडी रुकडी हातकणंगले
🔸गट: शेळी गट
1 हैदरअली समाधान
🔸गृह : ससे, विविध पक्षी व इतर
हैदरअली सभाधान
🔸सतेज कृषी प्रदर्शन २०२५ स्पर्धा निकाल गटळ
▪️गट फळे
१)प्रताप रघुनाथ पिळूनकर नागदेववाडी यांची केळी जी ,९१२२
२)श्री नारायण राजाराम पांडव देशी केळीचा २२ किलोचा घड १२० केळी द्वितीय क्रमांक
३)बाबासो रामचंद्र मुगडे यांची पाच किलो ची पपई १०१
४) श्री चेतन बळवंत मैद कडगाव यांचा बंपर ते जनार्दन उत्तेजनार्थ
५)अजय बापूसो पाटील चार किलो ची पपई १२३ उत्तेजनार्थ
🔸गट भाजीपाला
१) आप्पांना इजलिंग गुरव : मिरची
२)श्री विशाल जनार्दन पाटील तीन किलोचा दुधी भोपळा
३)विशाल पाटील दुधी भोपळा ४)ज्ञानदेव मारुती वांगणेकर कौलगे सिमला मिरची
५)सो. सारिका चौगुले 12 किलो वजनाचे भोपळा फळ
🔸फुल पिके
१) सुभाष मलगुंडे पाटील भडगाव ऑर्किड फुले.
२) संदीप भंडारी नरंदे निशिगंध.
३) श्री आप्पासो बापूसो माने खिद्रापूर शेवंती.
४) संजय नरसु लठ्ठे नांदणी जिप्सफिला
५) अनंत सिताराम पोटवणेकर खुपिरे बर्ड ऑफ पॅराडाईज .
🔸गट ऊस
१) अनिल जिनाप्पा मालगावे बुबनाळ तालुका शिरोळ ऊस जात को.८६०३२.४९ कांड्याचा ऊस
२) प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र कोल्हापूर सी ओ ८६०३२ वजनदार ऊस २.७
३) श्री संजय हरी पाटील धामणवाडी तालुका राधानगरी ऊस सी ओ ८००५ ३ किलोचा ऊस.
🔸कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय पुरस्कार
१) मीनाक्षी अजित नेंदुर्गे सांगोडे करवीर या प्रगतशील महिला शेतकरी असून 2011 17 दरम्यान आत्महंतर्गत कार्य केले आहे के डी एस ७२६ सोयाबीन मधून नऊ गुंठ्यात सहा क्विंटल उत्पादन तसेच भुईमूग उडीद आंतरपीक यशस्वीपणे घेतात.
२) प्रकाश देवाप्पा देसाई असनडोली तालुका गगनबावडा जिल्हा कोल्हापूर यांनी २०१२ पासून गावरान कुक्कुटपालन व्यवसायात काम करून शंभर किलोमीटर पिल्लांपासून सुरुवात करत आज आठवड्याला दहा हजार पिल्ले तयार करण्यापर्यंत प्रगती केली आहे.
३) शरद ज्ञानदेव देवेकर राहणार बसरेवाडी तालुका भुदरगड.
४) अर्चना हिम्मतराव देसाई या उद्यमशील महिले कडून चटणी व विधिक शेती प्रक्रिया उत्पादने तयार केली जातात.
५) वैभव राजेंद्र पाटील राहणार आसळज तालुका गगनबावडा वैभव फुड्स.
६) साताप्पा आप्पासो पाटील कळंकवाडी २०१५ साली जय भवानी महिला बचत गटाची स्थापना करून गटांतर्गत दहा लाख रुपयांची विक्री साध्य केली आहे.
७) तानाजी बंडू पाटील बेले, तालुका करवीर यांनी पारंपारिक शेती ऐवजी आधुनिक शेतीचा प्रयोग म्हणून सन २०१८/१९मध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत शंभर टक्के अनुदानावर तुती लागवड करून रेशीम शेती सुरू केली आहे.
🔸विविध प्रात्यक्षिक मांडणी केल्याबद्दल
१) तालुका कृषी अधिकारी कार्यालय करवीर
२)तालुका कृषी अधिकारी कार्यालय शिरोळ
३)तालुका कृषी अधिकारी कार्यालय राधानगरी
४) तालुका कृषी अधिकारी कार्यालय पन्हाळा.
५)तालुका कृषी अधिकारी कार्यालय शाहुवाडी
६)तालुका कृषी अधिकारी कार्यालय हातकलंगले
७)तालुका कृषी अधिकारी कार्यालय भुदरगड तालुका कृषी अधिकारी कार्यालय कागल
८) प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय कोल्हापूर आदींचा सन्मान करण्यात आला.
यावेळी संशोधक शास्त्रज्ञ अशोकराव मिसाळ यांनी पूर्ण उपक्रम राबविले आहेत आधुनिक शेती पीक व्यवस्थापन जैविक शेती सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान आधारित शेती अशा विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून ग्रामीण भागात शाश्वत कृषी विकासाला चालना दिली आहे त्यांचा सन्मान करण्यात आला.
गोकुळ, महालक्ष्मी शेती विकास केंद्र शाहूपुरी, संजय घोडावत ग्रुप, चितळे डेअरी, यांचे प्रायोजकत्व प्रदर्शनाला लाभले आहे.त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग,आत्मा,पशुसंवर्धन विभाग,जिल्हा परिषद,पणन विभाग, कृषी विज्ञान केंद्र, यांचे सहकार्य लाभले आहे. यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी-बियाणे, किटकनाशके, रासायनिक खते कोल्हापूर संघटनेचे
या प्रदर्शनासाठी संयोजक विनोद पाटील,सुनील काटकर,धीरज पाटील, जयवंत जगताप कृषी विज्ञान केंद्र तळसंदे,जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगिरे,डॉ.सुनील कराड विभागीय संशोधन संचालक,नामदेवराव परीट, उपसंचालक कृषी विभाग, डॉ.प्रमोद बाबर पशु विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर,गोकुळचे हणमंत पाटील, डॉ.साळुंखे,युवराज पाटील तालुका कृषी अधिकारी, डी डी पाटील, महादेव नरके डी. वाय. पी.,स्काय स्टार इव्हेंट चे स्वप्नील सावंत आदींनी परिश्रम घेतले होते.
🔸सतेज कृषि प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात चार दिवसात विक्री झालेला शेतमाल :
१) सेंद्रीय गूळ : ५००० kg
२) इंद्रायणी तांदूळ : ९००० kg
३) आजरा घनसाळ : १०००० kg
४) इंद्रायणी कणी : ३५०० kg
५) रत्नागिरी २४ : ६००० kg
६) सेंद्रीय हळद : १५०० kg
७) नाचणी : १३०० kg
८) विविध बी बियाणे ३००० kg

