अफु अंमली पदार्थाची तस्करी करणारा तरुण गजाआड, 11 किलो 780 ग्रॅम अफुसह एकुण 1,20,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त
schedule21 May 25 person by visibility 237 categoryगुन्हे

कोल्हापूर : अफु अंमली पदार्थाची तस्करी करणारा इसमास अटक करण्यात आली त्याच्याकडून 11 किलो 780 ग्रॅम अफुसह एकुण 1,20,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई. स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली.
पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचे पथक अंमली पदार्थ विक्री करणारे इसमाचा शोध घेत असताना त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार प्रविण पाटील यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, अंबप फाटयाजळ एक इसम अफु या अमंली पदार्थाची विक्री करीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी छापा कारवाई कामी सुचना दिल्या. त्यानुसार पथकाचे अधिकारी व अमंलदार यांनी अंबप फाटा पाण्याच्या टाकीचे मागे तो राहत असले खोलीचे जवळ सापळा रचला. तो रहाणेस असले खोलीमध्ये छापा टाकुन त्यास पकडले व त्यास नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव रविंद्र गोधनराम बेनिवाल वय 20 रा. उदवनगर, पडियार जिल्हा- जोधपुर राजस्थान सध्या रा अंबप फाटा ता. हातकणंगले कोल्हापूर असे सांगीतले तो राहत असले खोलीची झडती घेतली असता, त्याचे खोलीमध्ये सुमारे 11 किलो 780 ग्रॅम वजनाचा अफू अंमली पदार्थ व इतर साहित्य असा एकूण 1,20,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. तो अफु योग्य त्या कायदेशिर प्रक्रिया पुर्ण करून दोन पंचाचे समक्ष जप्त करणेत आला आहे. अफू विक्री करणारा इसम नामे रविंद्र गोधनराम बेनिवाल यास ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द वडगांव पोलीस ठाणेस एनडीपीएस कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपीने त्याचे कब्जात मिळुन आलेला अफू अंमली पदार्थ कोठुन व कोणाकडुन आणला आहे याचा तपास वडगांव पोलीस ठाणे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित साो, मा. अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, मा.अपर पोलीस अधीक्षक, डॉ. बी. धीरज कुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेषे मोरे, पोलीस अमंलदार अरविंद पाटील, अशोक पोवार, अमित सर्जे, अनिकेत मोरे, कृष्णात पिंगळे, सुरेश पाटील, रुपेश माने, सोमराज पाटील, चालक अनिल जाधव व सुशिल पाटील यांनी केली आहे.