कोल्हापूर शहरात मोटार वाहन कायदद्याचे उल्लंघन करणाऱ्या ९२ रिक्षा चालकांवर कारवाई, ६३,८५०/- रु. दंड वसूल
schedule11 Oct 25 person by visibility 439 categoryगुन्हे

कोल्हापूर : मोटार वाहन कायदद्याचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा रिक्षा चालकावर शहर वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर यांचेकरवी संयुक्त मोहिम राबवून ९२ रिक्षा चालकांचेवर कारवाई करुन त्यांचेकडून ६३,८५०/- रु. दंड आकारण्यात आला आहे.
दिनांक ११.१०.२०२५ रोजी सकाळी १०.०० ते सायकांळी ०६,०० वा. या कालावधीत शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर व प्रादेशिक परिवहन विभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑटो रिक्षा तपासणी मोहीम राबविण्यात आली,
तरी शहर वाहतूक शाखा, कोल्हापूरचे वतीने सर्व ऑटो चालक यांना आवाहन करण्यात येते की, मोटार वाहन कायदयाचे उल्लंघन करणारे ऑटो धारकावर कारवाईची मोहीम पुढील काळातही व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. तरी ऑटो चालकांनी कायदेशीर कारवाई टाळावी. ऑटो रिक्षा चालक यांनी मोटर वाहन कायदयाचे नियमांचे पालन करावे.
ही कारवाई शहर वाहतुक शाखेकडील पो. नि. नंदकुमार मोरे यांचे निरीक्षणाखाली करण्यात आली. सदर कारवाई मध्ये आरटीओ निरीक्षक श्री. विनायक सुर्यवंशी व श्रीमती ज्योती पाटील यांनी सहभाग घेतला आहे.
सदर मोहिमेदरम्यान मोटर वाहन कायदयाचे उल्लंघन करणारे रिक्षा चालक यांचेवर खालील प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
