राज्यात 15 ऑक्टोबर पासून वादळी पावसाचा अंदाज
schedule12 Oct 25 person by visibility 125 categoryराज्य

▪️शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे आणि नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे. मात्र 15 ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित आहे. या तारखेपासून किमान 18 ऑक्टोबर पर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपार नंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे.
सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकतं, जिथे या दरम्यान अनेक भागांमध्ये आभाळी हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील. तुलनेत खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो.
शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.