भागीरथी महिला संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन यांच्यातर्फे पाडळी खुर्द येथील विद्या मंदिरमध्ये आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा
schedule12 Oct 25 person by visibility 151 categoryसामाजिक

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द इथल्या कुमार विद्या मंदिरमध्ये विद्यार्थ्यांसाठी आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा पार पडली. त्यातून विद्यार्थ्यांना हस्तकलेचा आनंद मिळाला. शिवाय भारतीय संस्कृतीचं महत्त्व समजून घेण्याची एक उत्तम संधी मिळाली.
भागीरथी महिला संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन यांच्या वतीने, करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द इथल्या कुमार विद्यामंदिरमध्ये आकाश कंदील निर्मिती कार्यशाळा झाली.
यावेळी भागीरथीच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, रोटरीचे अध्यक्ष केतन मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती. भागीरथी संस्थेच्या माध्यमातून वाचनालये सुरू केली आहेत. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी, सर्व शाळांनी हा उपक्रम राबवावा असे आवाहन अरूंधती महाडिक यांनी केले. तसेच आकाश कंदील बनवण्याच्या कार्यशाळेतून मुलांना हस्तकलेची गोडी लागले, त्यांच्यामध्ये एकाग्रता वाढीस लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर रोटरीचे अध्यक्ष केतन मेहता यांनी समाजातील वंचित आणि गरजू घटकांना मदत करण्यासाठी रोटरी अव्याहत काम करत असल्याचे सांगितले. यावेळी उत्तम पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षक अरुण प्रभावळे यांनी प्रशिक्षण देऊन, विद्यार्थ्यांकडून आकाश कंदील बनवून घेतले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पाटील, सरपंच तानाजी पालकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील, मंगल पाटील, कांचन पाटील, सई सोहनी, शिवराज पाटील, मुख्याध्यापिका सुवर्णा खाडे, डॉक्टर धनाजी जाधव, युवाशक्तीचे राहुल माने, किशोर बठेजा, सिताराम पाटील यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.