इचलकरंजीतील कुख्यात 'एसएन गँग' वर 'मोक्का' अंतर्गत कारवाई
schedule25 Oct 25 person by visibility 109 categoryगुन्हे
कोल्हापूर : इचलकरंजी शहर व परिसरातील कुख्यात' एसएन गँग 'वर 'मोक्का' (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली याबाबत सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी मंजुरी दिली.
पोलीस ठाणे इचलकरंजी येथे दि. १६ जुलै रोजी दाखल गुन्ह्याचे फिर्यादी पुनम प्रशांत कुलकर्णी, वय ४३ वर्ष, रा. जैनवस्ती, इचलकरंजी, ता. हातकणंगले यांनी फिर्याद दिली की, इचलकरंजी शहराचे मध्यवर्ती परिसरामध्ये फाळकुट दादा म्हणुन बदलौकीक निर्माण झालेल्या १) सलमान राजु नदाफ, वय २५ वर्ष, रा.१/२७, परिट गल्ली, गांवभाग, इचलकरंजी, जि. कोल्हापूर व त्याचे नेतृत्वाखालील एसएन गैंग' या संघटित गुन्हेगारी संघटनेचे सदस्य २) अविनाश विजय पडीयार, वय १९ वर्ष, रा. मूळ १०/६०६, गोसावी गल्ली, इचलकरंजी सध्या रा. खंडोबावाडी, पडीयार वसाहत, यड्राव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, ३) अरसलान यासीन सय्यद, वय १९ वर्ष, रा. सुतारमळा, गल्लो नं.१, जावेद मुजावर यांचे घरी भाड्याने इचलकरंजी, मूळ रा. जवाहरनगर, सरनाईक वसाहत, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, ४) यश संदीप भिसे, वय १९ वर्ष, रा. रामनगर, गल्ली नं.५. शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, ५) रोहित शंकर आसाल, वय १९ वर्ष, रा. शिदेमळा, खोतवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, ६) अनिकेत विजय पोवार, वय २२ वर्ष रा. दत्तवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर यांनी फिर्यादी यांना दि. १५/०७/२०२५ रोजी दुपारी २०.३० वा.चे सुमारास वातील फिर्यादी त्यांचे सानबी लेडीज ब्युटी पार्लर येथे असतांना आरोपीत सलमान राजु नदाफ व इतर आरोपीत हे फटाके उडवत असतांना त्यामधील एक शॉट फिर्यादी जवळ येवून पडला त्यामुळे फिर्यादी यांनी फटाके अंगावर येत आहेत लांब जावुन लावा असे म्हंटल्याचे कारणावरुन आरोपीत यांनी राग मनात ठेवून संगनमत करुन टोळीची दहशत निर्माण करणेचे उद्देशाने फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने फिर्यादीच्या डोक्यात दगड घालून हिला संपवून टाकूया असे म्हणत शिवीगाळ करत आरोपी सलमान नदाफ याने फिर्यादीच्या दिशेने दगड फेकुन मारुन फिर्यादीस गंभीर जखमी केले. तसेच सर्व आरोपींनी मिळून फिर्यादीच्या ब्युटीपार्लरच्या खोलीच्या दरवाजाचे, बोडांचे व खिडकीचे आणि शेजारी राहणारे दयानंद लाड यांच्या दुकानाच्या शटरचे व सागर पाटील यांच्या संडासच्या दरवाजाचे नुकसान केले म्हणून वगैरे फिर्याद दिलेने गुन्हा दाखल करणेत आला होता. सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास सपोनि पुनम माने, इचलकरंजी पोलीस स्टेशन यांनी केला आहे.
सदरचा गुन्हा दाखल झालेनंतर कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार, यांनी सदर संघटित गुन्हेगारी टोळीचे गुन्हे पार्श्वभूमीचा आढावा घेतला त्यामध्ये विद्यमान टोळी प्रमुख टोळी सदस्यांचेवर यापूर्वी गंभीर व दखलपात्र गुन्हे दाखल असलेचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलीस अधीक्षक , कोल्हापूर यांनी मा. अपर पोलीस अधीक्षक, गडहिंग्लज विभाग, कॅम्प इचलकरंजी आण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी, इचलकरंजी उपविभाग, इचलकरंजी विक्रांत गायकवाड यांना तातडीने संघटित गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनासाठी मोक्का कारवाईचा प्रस्ताव सादर करणेचे निर्देश दिले. त्याप्रमाणे त्यांनी पोलीस निरीक्षक, इचलकरंजी पोलीस ठाणे महेश चव्हाण यांनी प्रस्ताव पोलीस अधीक्षक, कोल्हापूर योगेश कुमार यांचेकडे सादर केला.
सादर केलेल्या प्रस्तावाचे छाननी मध्ये गुन्ह्याचे प्राथमिक तपासात संघटित गुन्हेगारीचा प्रकार निष्पन्न झाला. तपासामध्ये सदर "एसएन गैंग' या संघटित गुन्हेगारी संघटनेविरुध्द खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी वसुली, एखाद्या व्यक्तीला हानी पोहोचवण्याच्या किंवा गुन्हा करण्यासाठी विष किंवा इतर हानिकारक पदार्थ सेवन करावयास लावणे, पुर्वग्रहदूषितरित्या प्राणघातक शस्त्रासह सार्वजनिक ठिकाणी गर्दीमारामारी करुन जखमी करणे, बंदी आदेशाचा भंग, फौजदारीपात्र धाकटदपटशा असे १७ गंभीर व दखलपात्र व १ अदखलपात्र असे एकुण १८ गुन्हे दाखल असलेचे निष्पन्न झाले.
सादर केले प्रस्तावाची पो.नि. स्था.गु.शाखा, कोल्हापूर यांनी छाननी करुन प्रस्ताव पोलीस अधीक्षक कोल्हापूर योगेश कुमार यांचेकडे सादर केला. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर योगेश कुमार यांनी प्रस्तावाच्या कायदेशिर बाबी तपासून प्रस्ताव पुर्वपरवानगी साठी विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर सुनिल फुलारी यांचेकडे सादर केला.
सक्षम प्राधिकारी सुनिल फुलारी , यांनी छाननीअंती वर नमूद गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाले "एसएन गैंग' या संघटित गुन्हेगारी संघटनेविरुध्द मोका अधिनियमाचे वाढीव कलमांचा अंर्तभाव करणेस पुर्वपरवानगी देवून तसे आदेश निर्गमित केले. मंजुरी आदेशानुसार सदर गुन्ह्याचा पुढील तपास विक्रांत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, इचलकरंजी उपविभाग, इचलकरंजी यांचेकडे वर्ग करणेत आला आहे. सदर 'एनएन गैंग' या संघटित गुन्हेगारी संघटनेच्या तसेच सदर परिसरातील अन्य संघटित गुन्हेगारी संघटनांच्या गुन्हेगारी कृत्यांना बळी पडलेल्या पिडीत व्यक्तींना तक्रार दाखल करावयाची असलेस नजीकच्या पोलीस ठाणेशी किंवा इचलकरंजी पोलीस ठाणेशी संपर्क साधावा असे याव्दारे आवाहन करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला आवाहन करण्यात येते की, अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असणारे गुन्हेगारांच्या गुन्हेगारी कृत्ये व अत्याचारास बळीपडलेल्या पिडीत व्यक्तींनी निर्भयपणे पुढे येवून स्थानिक पोलीस ठाणे किवा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेशी संपर्क साधून त्यांच्या तक्रारी नोंदवाव्यात.
या कारवाईमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार, यांचे नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक, गडहिंग्लज विभाग आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, इचलकरंजी उपविभाग, इचलकरंजी विक्रांत गायकवाड, यांचे मार्गदर्शनाखालील इचलकरंजी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण व त्यांचेकडील पोहवा उदय करडे, शहर उपविभाग कार्यालयाकडील पोहवा साजीद कुरणे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर श्री. रविंद्र कळमकर व त्यांचेकडील सहा. फौज, सचिन पार्वती सुर्याजी पाटील अशांनी ही कामगिरी पार पाडली.