संतापजनक! १३ वर्षांच्या मुलीवर जन्मदात्याचा अत्याचार, नराधमाला अटक
schedule25 Oct 25 person by visibility 139 categoryगुन्हे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात स्वतःच्या तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच शस्त्राचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा प्रकार उघड केला आहे. करवीर पोलिसांनी नराधम बापाला अटक केली
नराधम बापाच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीची आई आणि दोन लहान मुले कोल्हापूर येथील एका उपनगरात वास्तव्याला होते. मुलीची आई भंगार गोळा करून मुलांचा सांभाळ करीत होती. मात्र, दिवाळीचे कारण पुढे करून नराधामाने तेरा वर्षांच्या मुलीला गावी नेले.
दरम्यान, बुधवारी (दि.22), व शुक्रवारी (दि. 24) नरारामाने धारदार शस्त्राचा धाक दाखवून स्वतःच्या तेरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही माथेफिरूने पीडित मुलीला दिली. मुलीने हा प्रकार आईला सांगतात त्यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची नागरिकांकडून जोरदार मागणी होत आहे. सामाजिक संस्थांनीही या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे