कागल उरुसासाठी के.एम.टी. ची विशेष बस सेवा
schedule25 Oct 25 person by visibility 126 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : के.एम.टी. उपक्रमामार्फत कागल येथे भरणाऱ्या श्री गहिनीनाथ ऊरुसासासाठी रविवार दि.26/10/2025 रोजी विशेष बस सेवा देणेत येणार आहे.
कागल मार्गावरील बोंद्रेनगर, आपटेनगर-सुर्वेनगर-साळोखेनगर ते कागल या नियमित बससेवेबरोबरच गंगावेश येथून प्रवासी उपलब्धतेनुसार रात्रौ 10.30 वाजेपर्यंत कागल येथे जाणेसाठी बससेवा उपलब्ध करणेत आलेली आहे.
गंगावेश येथून सुटणाऱ्या बसेस एस.टी. स्टॅण्ड-तावडे हॉटेलमार्गे - कागल, व रेल्वे फाटक-राजारामपुरी - शिवाजी विद्यापिठ मार्गे कागल या मार्गावरुन धावतील. तरी, या बससेवेचा लाभ सर्व प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन के.एम.टी. उपक्रमाच्या वतीने करणेत आले आहे.