भाजपकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागणीचे अर्ज दाखल करावेत; भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचे आवाहन
schedule25 Oct 25 person by visibility 108 categoryराजकीय
कोल्हापूर : आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी कोल्हापूर पश्चिम विभागातील ज्या इच्छुक उमेदवारांना पक्षाकडून उमेदवारी करायची आहे अशा इच्छुक उमेदवारांनी भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयाकडे विहित नमुन्यामध्ये अर्ज दाखल करावा असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले आहे .
आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा कोल्हापूर जिल्हा पश्चिम या संघटनात्मक जिल्ह्यामध्ये पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी अनेक इच्छुक उमेदवारांची इच्छा आहे या इच्छुक उमेदवारांची जिल्हा परिषद व पंचायत समिती निहाय माहिती संकलित करण्यासाठी भाजपाचे माजी जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून या समितीमध्ये सरचिटणीस मेजर भिकाजी जाधव डॉ .आनंद गुरव व अनिल देसाई यांचा समावेश करण्यात आला आहे .
कोल्हापूर पश्चिम जिल्ह्यामध्ये एकूण 43 जिल्हा परिषद गट व ८६ पंचायत समिती गण येतात. या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा कार्यालयामध्ये व त्या त्या मंडलाध्यक्षांकडे उपलब्ध करण्यात आले असून सदरचे अर्ज भरून निवडणूक समितीकडे व जिल्हा कार्यालयाकडे जमा करण्यात यावेत असे आवाहन पाटील यांनी केले आहे .
सदरचे अर्ज जिल्हा कार्यालयाकडे जमा झाल्यानंतर हे अर्ज नामदार चंद्रकांत दादा पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक आमदार शिवाजीराव पाटील माजी मंत्री भरमु सुबराव पाटील माजी आमदार संजय बाबा घाटगे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या समिती समोर ठेवण्यात येतील
त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा कार्यालय व समितीकडे दाखल करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले आहे.