गांधीनगर येथील महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरणाऱ्या चोरट्यास अटक
schedule25 Oct 25 person by visibility 125 categoryगुन्हे
कोल्हापूर : महिलेच्या गळ्यातील जबरदस्तीने सोन्याची चैन चोरी करण्याऱ्या चोरट्यास अटक करण्यात आली त्याच्याकडून एकुण ९०,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली.
दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०६.३० च्या सुमारास सुमारास फिर्यादी रिटा वाधवा वय ४२ वर्षे, रा. गांधीनगर, ता. करवीर या दिवाळी सणानिमीत्त लागणारे साहित्य खरेदी करून परत घरी जात असताना पठाण डॉक्टर यांचे दवाखान्यासमोरील रोडवर खाऊ गल्ली, गांधीनगर येथे पाठीमागून एक अनोळखी व्यक्तीने येवून फिर्यादी यांच्या गळ्यात हात घालून गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसडा मारून चोरी करून घेवून गेल्याची फिर्याद दिली होती. याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
तपास पथकाने केंद्रीय प्राथमिक शाळेसमोर रोडवर सापळा लावून आरोपी रितेश रविंद्र कंगणे वय ३६, रा. शाहूनगर, हुपरी, ता. हातकणंगले यांस ताब्यात घेवून त्याचेकडून ६.६०० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व मोबाईल हँडसेट एक असा एकुण ९०,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल त्याचेकडून जप्त करण्यात आला आहे. जप्त मुद्देमाल व आरोपी यांस पुढील कारवाईकामी गांधीनगर पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार , अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार बच्चु यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे, पोलीस अंमलदार राजु कोरे, गजानन गुरव, वैभव पाटील, विशाल खराडे, अमित मर्दाने, महेश आंबी, अमित सजें, प्रदिप पाटील, संजय हुंबे, संतोष बरगे, सचिन जाधव, सतिश जंगम, सतिश सुर्यवंशी यांनी केली आहे.