+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule03 May 24 person by visibility 349 categoryराजकीय
कोल्हापूर: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (शुक्रवार) करवीर निवासीनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. दरम्यान, मंत्री शहा यांनी मुक्कामस्थळी कोल्हापूर व हातकणंगले मतदार संघातील परिस्थितीची सविस्तर माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून घेतली. 

दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गृहमंत्री आपल्या ताफ्यासह अंबाबाई मंदिरात दाखल झाले. त्यांचे स्वागत देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर-देसाई व सहकाऱ्यांनी केले. यावेळी खा. धनंजय महाडिक, प्रदेश भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, राहुल चिकोडे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, तुषार देसाई, अमित हुक्केरीकर व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दर्शनानंतर शहा पुढील प्रवासासाठी विमानतळाकडे रवाना झाले.

उमेदवार प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने, समरजीतसिंह राजे घाटगे यांच्या सर्व मित्र पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. दोन्ही मतदारसंघाचा आढावा घेतला.