कोल्हापुरातील ए व बी वॉर्डचा गुरुवारी पाणी पुरवठा बंद
schedule04 Nov 25 person by visibility 137 categoryमहानगरपालिका
▪️ई वॉर्ड व बालिंगा योजनेवर अवलंबून असणा-या सी व डी वॉर्डचा पाणी पुरवठा सुरु राहणार
कोल्हापूर : काळम्मावाडी योजनेतील पुईखडी फिल्टर हाऊसचे नियमित देखभाल दुरुस्तीचे काम गुरूवार, दि.6 नोव्हेंबर 2025 रोजी हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये साळोखेनगर उंच टाकी येथील 1100 मी.मी. मुख्य गुरूत्ववाहीनीवरील व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच जुने आपटेनगर येथील उंच टाकी कायम स्वरूपी बंद करण्यासाठी टाकीचे इनलेट व आऊटलेट कनेक्शनही बंद करण्याचे काम यावेळी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असणाऱ्या शहरातील ए, बी वॉर्ड व सलग्नीत उपनगरे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना गुरूवार, दि.6 नोव्हेंबर 2025 रोजी होणारा पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच शुक्रवार, दि 7 नोव्हेंबर 2025 रोजी होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे.
तसेच काळम्मावाडी योजनेवरील संपूर्ण ई वॉर्ड व बालिंगा योजनेवर अवलंबून असणा-या सी व डी वॉर्ड मध्ये पाणी पुरवठा सुरु राहणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार शिंगणापूर येथून कसबा बावडा फिल्टर कडून कसबा बावडा, ताराबाई पार्क व कावळा नाका परिसरातील नागरीकांचाही पाणी पुरवठा सुरू राहणार आहे.
यामध्ये संपुर्ण ए, बी वॉर्डातील पुईखडी परिसर, कलिकते नगर, सुलोचना पार्क, इंगवले कॉलनी, नाना पाटील नगर, गंधर्वनगरी टाकी परिसर, कणेरकरनगर, बोंद्रनगर, राजोपाध्येनगर, सानेगुरूजी वसाहत, तुळजाभवानी परिसर, आपटेनगर टाकी परिसर, नवीन वाशीनाका, जिवबानाना पार्क, बापू रामनगर, साळोखेनगर, राजीव गांधी वसाहत, कात्याणी कॉम्ल्पलेस, तपोवन, देवकर पाणंद, मोरे मानेनगर, संभाजीनगर स्टँड परिसर, नाळे कॉलनी, रामानंदनगर, बालाजी पार्क, शाहू कॉलनी, सासणे कॉलनी, रायगड कॉलनी, जरगनगर, सुभाषनगर, शेंडापार्क, आर.के.नगर, भारती विद्यापीठ, म्हाडा कॉलनी, संभाजीनगर, गंजीमाळ, संपुर्ण शिवाजी पेठ, संपुर्ण मंगळवार पेठ, पोतणीस बोळ, मंगेशकर नगर, बेलबाग, महालक्ष्मीनगर, सरनाईक वसाहत, त्रिकोणे गॅरेज परिसर, नेहरूनगर, वाय.पी.पोवार नगर, जवाहरनगर व सलग्नित ग्रामीण भाग इत्यादी परिसरात पाणी पुरवठा होणार नाही.
तरी या कालावधीत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.