मेकॅनिकल कार पार्किंगचे काम अंतिम टप्प्यात; प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून मेकॅनिकल कार पार्किंगच्या कामाची पाहणी
schedule04 Nov 25 person by visibility 79 categoryमहानगरपालिका
▪️चार चाकी 38 वाहनांचे होणार पार्किंग
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने रेल्वे स्टेशन रोडवरील गोकुळ हॉटेल शेजारी उभारण्यात येत असलेले मेकॅनिकल कार पार्किंग प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज सकाळी सदर ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली.
या पाहणीदरम्यान प्रशासकांनी उर्वरित कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारास दिल्या. तसेच या पार्किंगच्या तीनही बाजूंना महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने साईड क्लॅडिंग करून एलईडी स्क्रीन बसविण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
सदर ठिकाणी रॅम्पचे काम पूर्ण झाले असून, छतावर रुफिंग व पत्र्याचे काम जलद गतीने सुरू आहे. तसेच नागरिकांच्या सुविधेसाठी येथे टॉयलेट व बाथरूमची सोय करण्यात येत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी 38 चारचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था उपलब्ध होणार आहे.
सदर प्रकल्पासाठी सुमारे 4.5 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत असून, या कामामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि वाहनधारकांना सुलभ पार्किंग सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता अरुण गुजर, आर्किटेक्ट विनय पाटील, कनिष्ठ अभियंता मिरा नगीमे तसेच ठेकेदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.