+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule04 May 24 person by visibility 313 categoryराजकीय
मुंबई : धुळ्यात लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जाच्या छाननीत वंचित आघाडीचे उमेदवार अब्दुर्र रहमान यांचा अर्ज लाभाच्या पदाच्या कारणावरून अवैध करण्यात आला आहे. एकूण 30 उमेदवारांपैकी 22 उमेदवारांचे वैध ठरले तर 8 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे.

धुळे लोकसभा मतदार संघ निवडणूकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया आज येथील नवीन नियोजन सभागृहात पार पडली.यावेळी उपस्थितांच्या समोर दाखल अर्जाची छाननी करण्यात आली. धुळे लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या एकूण 30 उमेदवारांपैकी 22 उमेदवारांचे वैध ठरले तर 8 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. यात वंचित बहुजन आघाडीचे आघाडीला फटका बसला आहे. आघाडीचे उमेदवार अब्दुर्र रहमान यांचा अर्ज बाद ठरला. 

या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया देत असताना निवडणूक यंत्रणेने त्यांच्याकडे असलेल्या लाभाच्या पदा संदर्भातील कारणावरून अर्ज बाद केल्याचे म्हटले आहे. सध्या आपण कोणत्याही लाभाच्या पदावर नसून कोणताही वेतन स्वरूपाचा लाभ घेत नसल्याचा दावा त्यांनी केला. या व्यतिरिक्त उमेदवारी अर्ज परिपूर्ण असल्याचा दावा देखील त्यांनी केला. त्यांचा सेवानिवृत्तीचा विषय वेगळा असून ही बाब न्यायप्रविष्ट आहे.