+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule01 Jul 24 person by visibility 280 categoryराजकीय
कोल्हापूर : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतलेल्या राज्यातील सर्व मुलींना चालू शैक्षणिक वर्षापासून मोफत उच्च शिक्षण या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी विवेकानंद कॉलेज, नागाळा पार्क याठिकाणी एकत्र येत सर्वांनी नाम.चंद्रकांतदादा पाटील यांचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा दिल्या. जिल्हाध्यक्ष विजय जाधव प्रदेश सचिव महेश जाधव यांनी शैक्षणिक क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल दादांचे मनस्वी अभिनंदन केले.

या शैक्षणिक निर्णयासाठी शासनाच्यावतीने २००० कोटी रुपयांची तरतूद केली असून सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलींच्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाल्याचे मत याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी व्यक्त केले. 

यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना पेढे वितरित करून आनंद व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी राहूल चिकोडे, सरचिटणीस गायत्री राऊत, सदानंद राजवर्धन, हेमंत आराध्ये, राजू मोरे, विराज चिखलीकर, शैलेश पाटील, विजयसिंह खाडे-पाटील, मंगला निपाणीकर, अभिजित शिंदे, रुपाराणी निकम, गिरीष साळुंखे, संतोष माळी, आजम जमादार, अशोक लोहार, संजय जासूद, दिलीप बोंद्रे, डॉ. शिवानंद पाटील, संदीप कुंभार, महेश यादव, महादेव बिरंजे, विश्वजित पवार, किशोर लाड, रविकिरण गवळी, शाहरुख गडवाले, प्रणोती पाटील, रिमा पालनकर, सौ ढवळे, वंदना बंबलवाड, पद्मजा गुहागरकर, लता बरगे, धीरज पाटील, प्रकाश घाटगे, मामा कोळवणकर, रांगोळे, किशोर लाड, रास्ते आदी उपस्थित होते.