+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule11 Jul 24 person by visibility 330 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून शहरातील जास्तीजास्त महिलांना लाभ मिळण्यासाठी 81 प्रभागात अर्ज स्विकारणेस सेंटर सुरु करा. या योजनेतून अर्ज भरुन घेण्यासाठी महिलांची कोणतीही अडवणूक, दिरंगाई किंवा पैशाची मागणी होणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत आज आयुक्त कार्यालयात आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती.

 यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, पंडीत पाटील, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटील, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर अभियंता सतीश फप्पे, आर.के.पाटील, रमेश कांबळे, महादेव फुलारी, सिस्टीम मॅनेजर यशपाल रजपूत, रवका अधिकारी प्रशांत पंडत, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, महिला व बाल अधीक्षक सौ.प्रिती घाटोळे, एनयूएलएमचे व्यवस्थापक निवास कोळी, रोहित सोनुले, विजय तळेकर व आशा वकर्स प्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविका उपस्थित होत्या.

प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी "नारी शक्ती दुत" या ॲपवर निशुल्क ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सोय उपलब्ध आहे. एनयूएलएमचे व्यवस्थापक यांनी शहरातील सर्व पात्र महिला बचत गटांना व प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेतील महिलांना सामावून घेऊन या योजनेचा लाभ दयावा. अतिरिक्त आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली चारही विभागीय कार्यालयातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर दैनंदिन आढावा घ्यावा. महापालिकेच्या विभागीय कार्यालयातील सुविधा केंद्रात, 54 शाळांमध्ये, नागरी आरोग्य केंद्रामध्ये अथवा स्वच्छता ऑफिसमध्ये हे 81 अर्ज स्विकृती केंद्र सुरु करण्याचे नियोजन विभागीय कार्यालय स्तरावर अतिरिक्त आयुक्त, उप-आयुक्त व उप-शहर अभियंता यांनी करावे. रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या महिलांनाही याच लाभ मिळण्यासाठी एक पथक त्या ठिकाणी नेमण्यात यावे. स्वच्छता कर्मचा-यांमार्फत प्रत्येक प्रभागात काम करताना घरोघरी फॉर्मचे वाटप करण्यात यावे.

 आंगणवाडी सेविका व आशा सेविकांनी 100 टक्के फॉर्म भरुन घेऊन ते ऑनलाईन अपलोड करावेत. शहरातील 56 सेतू केंद्रामधून फार कमी अर्ज अपलोड होत आहेत. शहरातील सर्व सेतू केंद्रांनी जास्तीत जास्त फॉर्म अपलोड करावेत. सर्व नियुक्त अधिकारी, कर्मचारी, अशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचे शुक्रवारी सकाळी 10 वाजता केशवराव भोसले येथे प्रशिक्षण घेण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांना दिल्या.