+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात : समीर देशपांडे; करवीर नगर वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त
schedule16 Oct 24 person by visibility 155 categoryसामाजिक
कोल्हापूर : आजचे हे जग निव्वळ स्पर्धेचे नसून ते संवाद कौशल्य, सादरीकरण, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनविषयक ज्ञान मिळविण्याचे आहे. विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी ते आत्मसात केले पाहिजे. सकारात्मक विचाराने प्रेरित होऊन अभ्यासात सातत्य, जिद्द, चिकाटी आणि कष्ट केल्यास यशप्राप्ती शक्य आहे, असे प्रतिपादन पुणे येथील 'यशदा'चे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांनी केले. 

शिवाजी विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा आणि मार्गदर्शन केंद्राच्या वतीने मानव्यशास्त्र सभागृहात 'स्पर्धा परीक्षा आणि नोकरीच्या संधी' या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ.जोगदंड बोलत होते. कार्यक्रमास रसायनशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. कैलास सोनवणे यांची विशेष उपस्थिती होती.

डॉ. जोगदंड म्हणाले, परीक्षार्थींनी राजहंसाप्रमाणे नीर-क्षीर विवेकवृत्तीने आवश्यक तेच ज्ञान प्राशन करण्याची कला आत्मसात करणे अनिवार्य ठरते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भिती आणि न्यूनगंड बाळता कामा नये. पुस्तके स्वत: शांत राहून व्यक्तीस बोलायला, जगायला शिकवितात आणि आत्मविश्वास देतात. आज प्रचंड संसाधने उपलब्ध आहेत, त्यांचा उत्तम उपयोग करून घेता आला पाहिजे. जर्मन, फ्रेंच, जपानी या भाषा कौशल्यांसह पर्यटन आणि कार्यक्रम व्यवस्थापनाचेही उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दुर्दम्य इच्छाशक्ती, त्याग, चौकस बुद्धी, वेळेचे व्यवस्थापन आणि शिस्तीची जोड असणे गरजेचे आहे. वाचन, मनन, लेखन, चिंतन, एकाग्रता आणि आकलन यामधून उत्तम स्पर्धक घडू शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी किती अंतर कापतो, यापेक्षा तो कोणत्या दिशेने जातो, याला खूप महत्त्व असते. विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रांचे बारकाईने वाचन केले पाहिजे. विशेषत: इंग्रजी वर्तमानपत्रे वाचण्याचा सराव केला पाहिजे. वक्तृत्व व लेखनशैली सुधारणेही गरजेचे आहे. वाचन करणे, नोटस् काढणे, पठण, मनन करणे, आकलन आणि विश्लेषण करणे या पध्दतीने अभ्यासाचा क्रम ठेवल्यास यशाचा मार्ग सुकर होतो. 

यावेळी स्पर्धा परीक्षा आणि मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ.जगन कराडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पवन कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.