+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule03 May 24 person by visibility 388 categoryराजकीय
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न गेल्या पाच वर्षांमध्ये कोल्हापूरच्या खासदारांनी संसदेमध्ये मांडलेले कधी आठवत नाही. अशा शब्दात विद्यमान खासदारावर जोरदार टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली. तसेच या लोकसभा निवडणुकीमध्ये दबावाचे, पैशाचे राजकारण होईल, पण ही निवडणूक देशाच्या भवितव्यासाठी असून ७ मे ला चूक कराल तर देशाचा भविष्यकाळा कधीही आपल्याला माफ करणार नाही. यामुळे न भूतो न भविष्य असा विजय शाहू छत्रपतींचा होईल असा विश्वास खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खासदार अमोल कोल्हे यांची जाहीर सभा उभा मारुती चौक शिवाजी पेठ येथे पार पडली. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार जयश्री जाधव यांच्यासह आघाडीतील नेते उपस्थित होते.
 
खासदार कोल्हे म्हणाले 'जय जवान, जय किसान' हा 70 वर्षातील नारा आहे. बळीराजाचा मुलगा आज सियाचीन मध्ये देशाचे संरक्षण करत आहे. तर त्याचा म्हातारा बाप दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीमध्ये हक्कासाठी आंदोलन करत होता. तेव्हा त्याच्यावर अश्रूधुराचा मारा, पाण्याचे फवारे मारले गेले. दिल्लीमध्ये येऊ नये. म्हणून काटेरी कुंपण घालण्यात आले. गेल्या 70 वर्षात जय जवान जय किसान हा दिलेला नारा तुम्ही कोणत्या तोंडाने म्हणणार आहात 'जय जवान, जय किसान' असा प्रश्न उपस्थित केला. 

शेतकरी शेतामध्ये खते बी बियाणे यासाठी दोन तीन लाख रुपये खर्च करतो पण त्यावरती ही जीएसटी लावला आहे. कर रूपाने शेतकरी हा वर्षामध्ये सर्वसाधारण 25000 रुपये कर देतो मात्र वर्षाला केंद्र सरकार सहा हजार रुपये शेतकऱ्यांना अनुदान देते याचा अर्थ दिवसाला फक्त सतरा रुपये मिळतात पण शेतकरी हा पिकाला हमीभाव द्या खतांच्या अवजारांच्या किंमत कमी करा म्हणून सांगत आहे .

 कोल्हे म्हणाले महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफी करत नाही. शिवसैनिक निखाऱ्यासारखा आहे पण तो एकदा का पेटला तर कोणालाही ऐकणार नाही. महाराष्ट्राचा बाणा मोडेल पण वाकणार नाही स्वाभिमानी जनता स्वाभिमान आपला घाण टाकणार नाही आपला मतदारसंघात मोठ-मोठे नेते येऊन गेलेत भारताचे पंतप्रधान मोदींनी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदींनी एक पत्रकार बैठकी घेती नाहीत पण त्यांना महाराष्ट्रात पराभव स्पष्ट दिसत असून पंतप्रधानांनी पाच संपादकांसोबत राऊंड टेबलवर बसून मुलाखत दिली.  हा महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेचा विजय आहे. असे मी मानतो. पंतप्रधान भाषणामध्ये धार्मिक उल्लेख करून तेढ वाढवण्याचे काम करत आहेत. पण पोटाच्या आगीला व मिळणाऱ्या भाकरीला जात आणि धर्म नसतो हे लक्षात ठेवले पाहिजे. युवकांना रोजगार मिळाला पाहिजे मात्र रोजगार सोडा सरकार त्यांना जुगार खेळा म्हणत आहेत या जाहिरातीच्या माध्यमातून सरकारने मोठ्या प्रमाणात निधी मिळवला आहे. मात्र युवकांना रोजगार देऊ शकले नाही. महागाई कमी झालेली नाही. अशा विविध घटनांचा परामर्ष घेत खासदार अमोल कोल्हे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

यावेळी मालोजीराजे छत्रपती, संजय पवार आदींनी विरोधकांचा समाचार घेत शाहू महाराज छत्रपती यांना विजयी करण्याचे आवाहन केले. तसेच शाहू छत्रपती यांनीही आपले मनोगत व्यक्त करत विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.