+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule24 Jul 24 person by visibility 391 categoryशैक्षणिक
इचलकरंजी : येथील डी  के. टी. ई. सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण पॉलीटेक्निकच्या कॅम्पस मधुन ७ विद्यार्थ्यांची ॲप्टीव्ह कांम्पोनन्ट लि. पुणे या नामांकित कंपनीत निवड झाली आहे.

या कॅम्पस मध्ये वाय सी पी च्या तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील आदित्य सिंग, मानसी मेनसंगी, सारंग मेहेरकर, सुशांत माळी. तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मधील भारती पटेल, लकी अर्दाळे, अमित चव्हाण यांची वार्षिक ६.०९ लाख रुपये पॅकेजवर निवड झाली आहे. 

 ॲप्टीव्ह कांम्पोनन्ट लि. पुणे ही आंतरराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनी असून जगभरातील ४८ देशांमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर टेस्टिंग सेवा, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन यासारख्या सेवा पुरविते. 

   ॲप्टीव्ह कांम्पोनन्ट लि. कंपनीतर्फे नुकताच कॅम्पस इंटरव्यूव आयोजित केला होता. त्यामधून कॅम्पस इंटरव्यूव प्रोसेस मध्ये टेक्निकल राऊंड एप्टीट्यूड टेस्ट तसेच पर्सनल एचआर इंटरव्यूव इत्यादी फेऱ्या घेण्यात आल्या त्यानंतर विद्यार्थ्यांची निवड झाली.

 डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणारे सॉफ्टस्कील प्रोग्रामस, देण्यात येणारे इंडस्ट्रीयल प्रशिक्षण, इंडस्ट्री भेटी, गेस्ट लेक्चर्स या सर्वांचा फायदा या विद्यार्थ्यांना होत असतो.

विद्यार्थ्यांच्या नामांकित कंपनीतील या निवडीने डीकेटीईच्या दर्जेदार तंत्रशिक्षणावर गुणवत्तेची मोहोर उमटवली आहे. विद्यार्थ्यांच्या सातत्याने होणाऱ्या निवडीने पॉलीटेक्निकने तंत्रशिक्षणातील वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे मनोगत मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांनी व्यक्त केले.

   संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व संचालकांचे सहकार्य लाभले.

   या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. ए. पी. कोथळी, उपप्राचार्य प्रा. बी. ए. टारे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर एम. बी. चौगुले डीकेटीई च्या कार्यकारी संचालिका डॉ. एल. एस. आडमुठे, विभाग प्रमुख व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.