+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule20 Jul 24 person by visibility 290 categoryशैक्षणिक
 कोल्हापूर : डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकची 25 वर्षांची वाटचाल अतिशय कौतुकास्पद आहे. सुमारे १० हजार अभियंते या पॉलिटेक्निकच्या माध्यमातून घडले असून भविष्यात हे कॉलेज आणखी नावलौकिक मिळवेल असा विश्वास डी. वाय पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी व्यक्त केला. 

  कसबा बावडा येथील डी वाय पाटील पॉलिटेक्निक रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार पाटील बोलत होते. डी वाय पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, संस्थेचे सचिव श्रीपाद धरणगुत्ती, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते केक कापून रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला. 

  आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, पंचवीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ही संस्था मोठी करण्यात अनेक माजी प्राचार्य आणि कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. या संस्थेतून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी आज जगभरात कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये पुढील शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळवली आहे. पॉलिटेक्निकने मिळवलेले हे यश अतिशय कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. पॉलिटेक्निक नावारूपाला आणण्यासाठी प्राचार्य डॉ. महादेव नरके यांचे मोलाचे योगदान आहे. यशाची घोडदौड अशीच सुरु राहून येत्या काळात पॉलिटेक्निक आणखी नावलौकिक मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

 प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी, पॉलिटेक्निकचे विद्यार्थी हेच आमचे ब्रँड ॲम्बेसिडर असल्याचे सांगितले. संस्थेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज देश आणि जगभरातील नामवंत कंपन्या शासकीय संस्था मध्ये कार्यरत असल्याचा अभिमान आहे. फक्त शैक्षणिक नाही तर कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात विद्यार्थी राज्य आणि देश पातळीवर नाव कमावले आहे. वेगवेगळ्या क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. पॉलिटेक्निकच्या सातत्यपूर्ण यशस्वी कामगिरीबद्दल सलगपणे व्हेरी गुड श्रेणी मिळाली आहे.

कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यानी पॉलीटेक्नीकच्या प्रगतीबद्दल कौतुक करत प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. या ठिकाणी ३ डी प्रिंटींग लॅबसह अन्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. संस्थेची यशाची घोडदौड अशीच सुरु राहो अशा शुभेच्छा दिल्या.

  डी वाय पाटील पॉलिटेक्निकचे माजी प्राचार्य विनय शिंदे, अभय जोशी, डॉ. सतीश पावसकर यांच्यासह परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या शिवानी यादव, विकीराज माने, पार्थ पाटील यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विनय शिंदे, अभय जोशी, डॉ. सतीश पावसकर, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेन्ट्रलचे अध्यक्ष संजय भगत, माजी विद्यार्थी विकीराज माने, आमित भोसले, माजी कर्मचारी नीता सूर्यवंशी पाटील, टी. सी. हजारे, एन.डी. देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.

   यावेळी डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, डी डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदेचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. आर के शर्मा, सी एच आर ओ श्रीलेखा साटम यांच्यासह डी. वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, रजिस्ट्रार, पॉलिटेक्निकचे विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी उपस्थित होते.