+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात : समीर देशपांडे; करवीर नगर वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त
schedule23 Jul 24 person by visibility 255 categoryशैक्षणिक
इचलकरंजी : डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांनी औदयोगिक क्षेत्रास उपयुक्त असा रोबोट विकसीत केला आहे. औद्योगिक क्षेत्रामधील व्यवसायातील अनेक संकटांचा विचार करुन हा रोबोट तयार केलेला आहे. अभिषेक पाटील, विपुल प्रभु आणि प्रथमेश रेपाळ यांनी डॉ एस.एम.करमुसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रोबोट बनविला आहे.

या रोबोटमुळे औद्योगिक क्षेत्रामधील औद्योगिक सुरक्षा, भूकंपग्रस्त व आग लागलेल्या इमारतीची तपासणी अन्य तपासणी शक्य होणार आहेत. या रोबोटचा उपयोग मेट्रोलाईन व उडडाणपूल बांधकाम देखरेखेसाठी करु शकतो. या रोबोटचा आणखी एक उपयोग म्हणजे जुन्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिटसाठी होवू शकतो.

हा रोबोट अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी खर्चात तयार करण्यात आलेला आहे त्यात लहान पण शक्तीशाली बी.एल.डीसी मोटर्स वापरुन सक्शन तयार केलेला आहे. यामुळे तो सहजतेने उभ्या पृष्ठभागावर चालू शकतो हा रोबोट मोबाईलच्या ब्ल्यूटयूथ वरुण नियंत्रित केला जावू शकतो. मोबाईलमधील ऍप्लीकेशनच्या सहायाने या रोबोटचा स्पीड, हालचाल आणि दिशा कंट्रोल करु शकतो. या यंत्राच्या विकासामुळे औदयगिक सुरक्षा आणि बचाव कार्यात महत्वपूर्ण योगदान होणार आहे.

या रोबोटमध्ये छायाचित्रे गोळा करण्यासाठी कॅमेरा वापरला आहे कृत्रिम बुध्दीमता आणि मशीन लर्निंग अल्गोरिदम वापरुण चित्रांवर प्रक्रिया केली जाते. हा रोबोट रोबोटीक आर्म, रास्पबेरी पाई बोर्ड, बक कन्व्हर्टर आणि मशीन लर्निंग अल्गोरिदम वापरुन विकसीत केला आहे. रास्पबेरी पाई बोर्ड रोबोट यंत्रणा नियंत्रित करते, बक कन्व्हर्टर रोबोटला शक्ती प्रदान करतेे. डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी औद्योगिक क्षेत्रातील समस्येंचा विचार करुन हा प्रकल्प विकसीत केलेला आहे.

संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाशआण्णा आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी रोबोट तयार केलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सदर विद्यार्थ्यांस प्र.संचालिका प्रा. डॉ. एल.एस. आडमुठे, विभागप्रमुख डॉ एस.ए.पाटील व सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.