+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule10 Oct 24 person by visibility 261 categoryदेश
नवी दिल्ली : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाढत्या वयाच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मार्च 1991 ते डिसेंबर 2012 या काळात रतन टाटा यांनी टाटा समूहाचे नेतृत्व केले. टाटा समूहाला नव्या उंचीवर नेले. त्यांनी टाटा ग्रुपला मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंत सर्व काही बनवणारी कंपनी बनवली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने अनेक मोठ्या कंपन्या ताब्यात घेतल्या.  रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखावटा जाहीर करण्यात आला आहे. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

दोनच दिवसांपूर्वी रतन टाटा यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत सुरू असलेल्या अफवाबाबत त्यांनी खंडन केले होते. टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त सोमवारी आले होते.

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. मुंबईच्या कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून त्यांनी सुरुवातीचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. 1962 मध्ये टाटा समूहात सामील होण्यापूर्वी रतन टाटा यांनी काही काळ अमेरिकेत काम केले. 1981 मध्ये त्यांना टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष बनवण्यात आले. 1991 मध्ये जेआरडी टाटा यांच्या निवृत्तीनंतर रतन टाटा यांनी टाटा समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले.

रतन टाटा यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाला नवी ओळख दिली. त्याने टेटली, जग्वार लँड रोव्हर आणि कोरस यासह अनेक मोठ्या परदेशी कंपन्या ताब्यात घेतल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक बनला.

 रतन टाटा त्यांच्या सामाजिक कार्यासाठीही ओळखले जात होते. ते टाटा ट्रस्टचे अध्यक्ष होते, जे शिक्षण, आरोग्य आणि गरिबी निर्मूलन यांसारख्या क्षेत्रात काम करते. रतन टाटा यांना त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखावटा जाहीर करण्यात आला आहे.