कोल्हापूर शहरात झालेल्या वादळी पावसात चाळीस उन्मळून पडलेली झाडे कटींग करुन उठाव
schedule21 May 25 person by visibility 275 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : शहरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी 40 झाडे उन्मळून पडली. तर 6 झाडांच्या मोठ्या फांद्या तुटलेल्या होत्या. या सर्व वृक्षांच्या फांद्या व मोठे पडलेले वृक्ष कटिंग करुन काढण्याचे आदेश प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी दिले होते. त्याप्रमाणे काल दुपारपासून अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाच्या कर्मचा-यांनी व ठेकेदार यांच्या मार्फत पडलेली झाडे कटींग करुन रात्रदिवस काढण्याचे कामे सुरु होते.
यामध्ये आज वेताळ तालीम चौक येथील रेंट्री झाडाच्या 2 फांद्या, शनिवार पेठ पोस्ट ऑफिस रोडवर 1 बदाम झाडाची फांदी, गुलमोहर कॉलनी महाडिक माळ रोडवर 1 कदंब झाड, जयंती नदी पुलावर 1 फायकस फांदी, महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील 1 बदाम झाडाची फांदी, महालक्ष्मी नगर रोडवरील 1 कॅसिया झाडाची फांदी अशा 6 झाडाच्या फांद्या पडलेल्या होत्या. तर टाकाळा माळी कॉलनी येथे गुलमोहराचे 1 झाड, शाहू सैनिक तरुण मंडळ जुना वाशी नाका येथे 1 रेन्ट्री झाड,
रेसकोर्स नाका रोडवर 1 गुलमोहर झाड, बी.एस.एन.एल. ऑफिस ताराबाई पार्कमध्ये 1 गुलमोहर झाड, पद्माराजे उद्यानात 1 सिल्व्हर ओकचे झाड, शिवाजी उद्यमनगर रोडवरील प्रसाद मोटर्स येथे 1 पितमोहरचे झाड, सेवा रुग्णालय शेजारील खाजगी जागेतील मोकळ्या मैदानात 1 कडुलिंबाचे झाड, सासणे ग्राऊंड समोर 1 बर्डचेरीचे झाड, पंचरत्न अपार्टमेंट रोडवर 1 गुलमोहर झाड, राजारामपुरी 5 वी गल्ली येथे 1 बर्डचेरीचे झाड, हनुमान नगर खाजगी जागेत 1 गुलमोहराचे गोठ्यावर पडले झाड, ॲस्टर आधार हॉस्पिटल रोडवर 1 पितमोहर झाड, भारती विद्यापीठ शेजारील रोडवर 1 गुलमोहर झाड, सिंधुनगरी, गजानन महाराजनगर येथील खाजगी जागेतील 1 आंब्याचे झाड अशी 15 मोठी झाडे उन्मळून पडली होती. या सर्व झाडांचे महापालिकेच्या उद्यान व अग्निशमन विभागाच्या कटरच्या सहाय्याने कटींग करुन जागेवरुन उठाव करण्याचे काम कालपासून सुरु होते.