SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
दर्जेदार वैद्यकीय शिक्षणासह रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफडीकेटीई येथे प्राध्यापक, स्टाफ यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न ‘गोकुळ’मध्ये सहकार मंत्रालय स्थापना सप्ताह, आंतरराष्ट्रीय सहकार दिन उत्साहातपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली राधानगरी धरणाला भेटडॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद : ऋतुराज पाटीलजयसिंगपूर येथील शेतकरी भवन मंजुरीबद्दल आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर यांचा सत्कारकोल्हापूर : भर पावसात बळीराजासोबत राबले पालकमंत्रीविजयी मेळावा : राज ठाकरे - उद्धव ठाकरे अखेर एकत्र, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या बदलाचे संकेतशेतकऱ्यांचे विठ्ठलाला साकडे : शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे!बँकिंग क्षेत्रामध्ये ग्राहकांचे महत्व प्रचंड : शरद गांगल

जाहिरात

 

डीकेटीई येथे प्राध्यापक, स्टाफ यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

schedule05 Jul 25 person by visibility 150 categoryसामाजिक

▪️आवाडे दादा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबीरात ३५० हून अधिक स्टाफना लाभ
इचलकरंजी :  डीकेटीई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, आदरणीय कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त डीकेटीईच्या प्राध्यापक व स्टाफ यांच्यासाठी डीकेटीईचे आमचे दादा कार्यक्रम समिती व एनएसएस विभाग, सिनर्जी मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, मिरज, नागरी सेवा आरोग्य  केंद्र, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते. या शिबीरात ३५० हून अधिक स्टाफवर मोफत रोगनिदान करण्यात आले. यासोबत दादांच्या वाढदिवसानिमित्त स्टाफसाठी हाफ पिज क्रिकेट स्पर्धा देखील मोठया दिमाखात संपन्न झाल्या यावेळी दादांच्या हस्ते सदर क्रिकेट स्पर्धेचा बक्षिस संमारंभ पार पडला.

आरोग्य शिबीराची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, ट्रस्टी डॉ ए. बी.सौंदत्तीकर, डायरेक्टर प्रा. डॉ. सौ. एल.एस. अडमुठे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. मानद सचिव डॉ सपना आवाडे यांनी दादांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या शिबीरामध्ये संस्थेच्या वतीने दादांना दीर्घायुष्य लाभो यासाठी मनोकामना व्यक्त केल्या.

यावेळी दादांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी महागाव कॉलेजचे प्राचार्य डॉ एस.एच.सावंत, डी. वाय. पाटील सीएसई चे प्रा. डॉ. बी.डी.जितकर व वसंतदादा पाटील मॅनेजमेंट एमसीए च्या विभागप्रमुख सौ.व्ही.एस.जाधव, सोशल डीन व एनएसनएस विभागप्रमुख सचिन कानिटकर, सर्व विभागप्रमुख यांचेसवे सिनर्जी मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल,मिरज यांचे हॉस्पिटलची संपूर्ण टीम उपस्थित होती.

या शिबीरामध्ये इसीजी, नेत्र तपासणी, दंत तापसणी, रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब, वजन, प्रोस्टेट, अशा अनेक तपासण्या करुण टी.टी. चे इंजिक्शन मोफत देण्यात आले.त्याचबरोबर यावेळी उपस्थितांना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळाला. या शिबीराच्या आयोजना बद्दल सर्व स्टाफनी समाधान व्यक्त केले. प्रा.सुयोग रायजाधव, श्रीकांत बेडक्याळे यांनी संयोजन प्रतिनीधी म्हणून काम पाहिले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी राहूल जगताप, प्रितम पाटील, किरण लंगोटे, निरंजन शेटटी, दिपक जाधव, दत्ता पाटील यांच्यासवे सर्वांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes