जयसिंगपूर येथील शेतकरी भवन मंजुरीबद्दल आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर यांचा सत्कार
schedule05 Jul 25 person by visibility 152 categoryसामाजिक

कोल्हापूर : जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यासाठी १.५३ कोटी रुपये निधीच्या प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यानिमित्त आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी समितीचे सभापती आण्णासाहेब पाणदारे, उपसभापती महावीर पाटील, माजी सभापती व संचालक सुभाषसिंग राजपूत, सुरेश माणगावे, मुजमिल पठाण, सचिव सुनील गावडे,कर्मचारी अभयकुमार मगदूम,मिलिंद चंदुरे, चंद्रकांत कोरे, बाजीराव कांबळे यांची उपस्थिती होती.
यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना सभापती पाणदारे म्हणाले, आमदार राजेंद्र पाटील यांनी गेल्या वर्षभरात या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला.त्यांच्या प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाला असून होणाऱ्या शेतकरी भवनामुळे शिरोळ तालुक्यात सह परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी मी सदैव कटिबद्ध आहे.हे भवन हे शेतकऱ्यांच्या आधुनिकतेकडे वाटचाल करण्याचे महत्त्वाचे पाऊल ठरेल, यापुढेही शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले.