+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule15 Jul 24 person by visibility 564 categoryसामाजिक
कोल्हापूर : विशाळगड अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण देत गजापूर मुसलमानवाडी येथील अल्पसंख्यांक मुस्लीम समाजातील घरे, दुकानांची फोडाफोडी, दगडफेक व नागरिकांवर अत्याचार करण्यात आले. या प्रकाराला संभाजीराजे छत्रपती जबाबदार असून त्यांना ताबडतोब अटक करावी, पोलीसांनी बघ्याची भूमिका घेतली त्यामुळे पोलीस अधीक्षकांची बदली करावी व जातीय दंगली घडविणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी मोहामेडन एज्युकेशन सोसायटी, मुस्लीम बोर्डीगने सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे केली. चेअरमन गणी आजरेकर व प्रशासक कादर मलबारी यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना याबाबतचे निवेदन दिले. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की विशाळगड येथे याठिकाणी व हिंदू व मुस्लिमांचे अतिक्रमण असताना केवळ मुस्लिम समाजावर अत्याचार केले गेले. घरांवर-प्रार्थनास्थळांवर दगडफेक, तोडफोड, महिला व लहान मुलांवर अत्याचार केले गेले हे पुरोगामी कोल्हापूरला न शोभणारे आहे. या समाजकंटकांचे नेतृत्व करणारे संभाजीराजे व स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी व याचे सुत्रधार पुण्याचा रविंद्र पडवळ यांच्याकडून नियोजनपूर्वक यासाठी रसद पुरवली गेली.

जमावबंदी असताना मोर्चा निघालाच कसा, अतिक्रमणविरोधी मोर्चा असताना हल्ला का केला गेला, गजापूरमध्ये कोणताही विषय नसताना तेथील मुस्लिम समाजावर अत्याचार का केले गेले. पोलीसांना मारहाण, पत्रकारांना धमकावण्याचा प्रकार झाले. विशाळगडावर जाण्यासाठी एकच रस्ता आहे, तेथे पोलीसांनी समाजकंटकांना हत्यारासह सोडले, नागरिकांना सुरक्षा न देता बघ्याची भूमिका घेतली.

तरी संघटनेचे नेते, कार्यकर्ते यांच्यावर कडक कलमे लाऊन सरकारी कामात अडथळा, पोलीसांवर हल्ला, महिलांचे विनयभंग, घरफोडी, लुटालुट,, प्रार्थनास्थळावर दगडफेक, धार्मिक ग्रंथ पेटविणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व विराट मुक मोर्चा काढू असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी शकिल अत्तार, रफिक मुल्ला, अब्दुलरहिम बागवान, गुलाब मुजावर, हुसेन मुजावर, सरफराज जमादार, जाफर मुजावर, अहमद मुजावर. सलीम अत्तार यांच्यासह मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.