+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule08 Oct 24 person by visibility 207 categoryदेश
 नवी दिल्ली ; हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी नुकतेच मतदान पार पडले. हरियाणा राज्यात ५ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या ९० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले, तर जम्मू-काश्मीरमध्ये ३ टप्प्यात झाले. यानंतर आता या दोन्ही निवडणुकीचे निकाल आज ८ऑक्टोबरला लागणार आहे. या निकालासाठी मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे. मात्र निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होण्यास दुपार होईल असे समजते.

 दरम्यान, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटविल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाल्यामुळे या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे. हरियाणातील मतदारांचा सहभाग जवळपास ६७.९० टक्के इतका होता. यामध्ये सिरसा जिल्ह्यातील एलेनाबाद विधानसभेच्या जागेवर सर्वाधिक ८० टक्के मतदान झाले. 

दरम्यान, ५ ऑक्टोबर रोजी हरियाणात एकाच टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर या निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये हरियाणात काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी प्रत्यक्षात आज ८ऑक्टोबर रोजी निकाल लागल्यानंतर कोणता पक्ष सत्ता काबीज करतो हे स्पष्ट होईल.