+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule30 Sep 24 person by visibility 312 categoryदेश
जम्मू : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जम्मूमध्ये रविवारी भाषण देत असताना अचानक स्टेजवर बेशुद्ध पडले. जसरोटा विधानसभा मतदारसंघातील बारनोटी येथे ते भाषण करत होते. मंचावर पडल्याने त्यांना काही मिनिटे भाषण थांबवावे लागले. यानंतर त्यांनी काही मिनिटे बसून भाषण केले. मी ८२ वर्षांचा आहे लगेच मरणार नाही. मोदींना सत्तेवरून हटवल्याशिवाय मी मरणार नाही, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.

खरगे म्हणाले की, केंद्र सरकारला जम्मू- काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याची कधीच इच्छा नव्हती. त्यांना निवडणूक हवी असती तर एक-दोन वर्षात निवडणुका झाल्या असत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यांना लेफ्टनंट गव्हर्नरच्या माध्यमातून रिमोट- नियंत्रित सरकार चालवायचे होते. 

पंतप्रधान मोदींनी गेल्या १० वर्षात भारतातील युवकांना काहीही दिले नाही. १० वर्षांत तुमची समृद्धी परत आणू शकत नाही, अशा व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवू शकता का?. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणे काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.