इब्रार सय्यद इनामदार शासकीय सेवेतुन बडतर्फ; कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांची कठोर कारवाई
schedule11 Oct 25 person by visibility 207 categoryगुन्हे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील मोटर परिवहन विभागात कार्यरत असलेले पोना/१२७५ इब्रार सय्यद आदम इनामदार, यांचे विरुद्ध *महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज सांगली येथे दि.०८/१०/२०२५ रोजी गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोना /१२७५ इब्रार सय्यद आदम इनामदार यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणुक) १९७९ मधील तरतुदीचा भंग करुन संशयास्पद सचोटी, संशयास्पद वर्तन, पोलीस दलाची प्रतिमा मलीन करुन कर्तव्यपरायणता न राखून पोलीस दलातील पदास अशोभनीय असे गैरवर्तन केले तसेच कायदयाचे परिपुर्ण ज्ञान असताना ही भारतीय न्याय संहिता च्याकलमांमधील तरतुदीचा भंग करुन बनावट भारतीय चलन नोटा तयार करणे, विक्री करणे, वापरणे हा गुन्हा असल्याचे माहिती असतानाही सदरचे गैरकृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील नियम २५ व २६ तसेच भारतीय संविधान १९५० मधील *अनुच्छेद क्रमांक ३११ (२) (ब) नुसार व (३) अन्वये पोना /१२७५ इब्रार सय्यद आदम इनामदार नेम. मोटार परिवहन विभाग, कोल्हापूर हे देशविघातक कृत्याशी संबंधीत असल्याने, त्यांची प्राथमिक चौकशी / विभागीय चौकशी करणे लोकहिताच्या दृष्टीने उचित नसलेने व वाजवीपणे व्यवहार्य नसलेने तसेच त्यांना बनावट नोटांच्या गुन्ह्यात अटक झाले दिनांकापासुन शासकीय सेवेतुन बडतर्फ शिक्षा दिलेली आहे.