+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule23 Jul 24 person by visibility 348 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या 'मिशन रोजगार' उपक्रमांतर्गत इमिटेशन ज्वेलरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग साळोखे नगर कॅम्पस येथील कोल्हापूर इनक्युबेशन सेंटर येथे 27 जुलै रोजी ही एक दिवसीय कार्यशाळा होणार आहे. 

सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभाग व जेम्स अँड ज्वेलरी सेक्टर स्किल कौन्सिल यांच्या रॅम्प या योजने अंतर्गत महिलांसाठी इमिटेशन ज्वेलरी या कार्यशाळेत कोल्हापुरी साज, फ्लावर ज्वेलरी, बुगडी, नथ, क्रिस्टल ज्वेलरी, कुंदन ज्वेलरी बनवण्याचे प्रत्यक्ष कौशल्य शिकवले जाणार आहे. यासोबतच शासकीय प्रमाणपत्र आणि मोफत उद्योग आधारची नोंदणीही करून दिली जाणार आहे.

या कार्यशाळेसाठी इच्छुक महिलांनी कोल्हापूर दक्षिण शहर काँग्रेस कमिटी, विज्ञान तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास सेलच्या उपाध्यक्ष श्रीमती प्रियंका मोहिते मोबाईल क्रमांक 8208339085 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर इनक्युबेशन सेंटरचे राजन डांगरे यांनी केले आहे.