+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule16 Jul 24 person by visibility 441 categoryसामाजिक
कोल्हापूर : किल्ले विशाळगड परिसरातील दंगलग्रस्त गजापूर गावास खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्थानिकांका आपल्या व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले. त्यांच्याशी संवाद साधला तसेच जीवनावश्यक साहित्याचे वाटप करून त्यांना दिलासा दिला. 

किल्ले विशाळगड येथील अतिक्रमणाशी कसलाही संबंध नसलेल्या गजापूर गावात घडलेली हिंसाचाराची घटना अतिशय दुर्दैवी असून संयमी कोल्हापूरकर धर्मांधतेच्या राजकारणापासून दूर राहून बंधुत्वाची भावना जोपासत संपूर्ण देशासमोर अनुकरणीय आदर्श ठेवतील याची खात्री आहे. अशी भावना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, सत्यजित पाटील सरुडकर राष्ट्रवादीचे व्ही.बी. पाटील, आर.के. पोवार, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, कादर मलबारी, भारतीताई पोवार यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.