SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आपत्ती काळात संपर्कासाठी राज्य, जिल्हा, महापालिका नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांकदेशातील १०३, मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळारोडसह राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पणसारथी अंतर्गत मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयं रोजगाराच्या संधीआत्मा योजनेंतर्गत गुडाळ येथे शनिवारी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची बदली; योगेश गुप्ता कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षकअलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंची वाढीला महाराष्ट्राचा पूर्ण विरोध, खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसमोर भुमिकाशिवाजी विद्यापीठातील प्रियंका पवारची जर्मनीतील हॅनोवर विद्यापीठामध्ये समर स्कूल प्रोग्रामसाठी निवडप्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात भेट; जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी साधला संवादसिंधुदुर्ग सुपुत्र सदानंद करंदीकर यांचे दातृत्व; वीस लाखांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द; पंतप्रधान, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदानडीकेटीईच्या सहा विद्यार्थ्यांची मित्सुबिशी इलेक्ट्रीक ‘ कंपनीमध्ये निवड

जाहिरात

 

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र - मुंबई यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’चा २५ मे रोजी लोकार्पण सोहळा

schedule21 May 25 person by visibility 341 categoryराज्य

▪️ ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’ वितरण समारंभाचे आयोजन

सांगोला : महाराष्ट्रातील पत्रकारांच्या नव्या पिढीच्या करिअर आणि कल्याणासाठी स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचा भव्य लोकार्पण सोहळा आणि ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’ वितरण समारंभ रविवार, दि. २५ मे २०२५ रोजी सायंकाळी JW Marriott, पुणे येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र.शिक्षणमंत्री व संसदीय कार्यमंत्री, नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थान महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे भुषविणार आहेत.

 विशेष उपस्थिती व पुरस्कार वितरण  ग्रामविकास व पंचायतराज मंत्री नाम. जयकुमार गोरे , पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे या मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहेत .अशी माहिती प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजा माने व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांनी दिली आहे.

   हा सोहळा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र – मुंबई यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला आहे. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’, ‘महाराष्ट्र महागौरव पत्रकारिता पुरस्कार २०२५’ आणि ‘डिजिटल स्टार पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येणार आहे.


प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  राजा माने यांनी सांगितले की, “हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित नसून, पत्रकारिता व समाजसेवेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. नव्या पिढीला दिशा देणारा व समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग निर्माण करणारा हा उपक्रम ठरणार आहे.”

कार्यक्रमात प्रतिबिंब प्रतिष्ठानचा लोकार्पण सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न होईल. त्यानंतर महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५ विविध क्षेत्रांतील मान्यवरांना प्रदान करण्यात येतील.हा उपक्रम नव्या पिढीच्या पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरेल आणि त्यांच्यासाठी नवी आशा निर्माण करेल, असा विश्वास डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक राजा माने यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५ - पुरस्कार विजेते:पालघरचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांना आदिवासी भागातील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुरस्कार देण्यात येणार आहे. बिग हिट मीडिया कला व मनोरंजन क्षेत्रासाठी अनुष्का सोलवट यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. कला व मनोरंजन क्षेत्रातील कार्यासाठी ऋतिक मणी यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. कला मनोरंजन क्षेत्रातील कार्यासाठी अनिल मणी यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.

 तृतीयपंथीय व देहविक्रय क्षेत्रातील महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल बार्शी येथील सचिन वायकुळे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. शिक्षण व ग्रामविकास कार्यासाठी कंधार नांदेड येथील प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. भटक्या-विमुक्त जमातीसाठी कार्य केल्याबद्दल नळदुर्ग धाराशिव येथील उमाकांत मिटकर यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. महिला सक्षमीकरण व समाजसेवा कार्याबद्दल सोलापूर येथील मोहन डांगरे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.युवा उद्योजक, बांधकाम व सामाजिक  कार्याबद्दल महाबळेश्वर येथील प्रशांत मोरे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे . सामाजिक कार्याबद्दल जामखेड येथील संजय कोठारी यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. साखर उद्योग क्षेत्रातील कार्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील नामदेवराव खराडे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे . चिक्की उद्योगासाठी पाचगणी येथील स्वप्नील परदेशी यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. शिक्षण, क्रीडा व साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल छत्रपती संभाजी नगर येथील विजय राऊत यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. बेघर मनोरुग्ण पुनर्वसन कार्याबद्दल यवतमाळ येथील संदीप शिंदे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रगत व सेंद्रिय  शेतीबद्दल बीड येथील शिवराम घोडके यांना हा  पुरस्कार देण्यात येणार आहे. बेवारस, मनोरुग्ण पुनर्वसन कार्यासाठी सोलापूर येथील आतिश शिरसाट यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

 श्री. विघ्नहर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून भास्कर घुले हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ग्रामविकास व समाजसेवा या कार्यासाठी बार्शी येथील संतोष ठोंबरे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. सहकारी साखर कारखाना व्यवस्थापन कार्याबद्दल कोरेगावचे मानसिंगराव चव्हाण यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. निराधार पुनर्वसन, दिव्यवंदना आधार फाउंडेशन कार्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल गडचिरोलीचे शुभम पसारकर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र महागौरव पत्रकारिता पुरस्कार २०२५ यामध्ये मुंबई एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक ;  मुंबई आज तकचे संपादक साहिल जोशी ,छत्रपती संभाजीनगरचे ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे, कोल्हापूर लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार भारत चव्हाण;  मुंबई विधीमंडळ वार्ताहर संघ, मंत्रालय अध्यक्ष दिलीप सपाटे. डिजिटल स्टार पुरस्कार प्राप्त मान्यवरामध्ये  पोलीसनामाचे नितीन पाटील, लोकमत डिजिटलच्या अश्विनी जाधव, महाराष्ट्र टाइम्स डिजिटलचे अभिजीत दराडे, लेटसअप डिजिटलचे विष्णू सानप, मुंबई तक डिजिटलचे ओमकार वाबळे यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत.

संयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ,प्रतिबिंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजा माने या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. या कार्यक्रमासाठी संयोजन समितीचे पदाधिकारी राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, सचिव महेश कुगांवकर , राज्य उपाध्यक्ष नंदकुमार सुतार , राज्य सहसचिव केतन महामुनी, राज्य संघटक शामल खैरनार , राष्ट्रीय संघटक राजू वाघमारे ,  पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, राज्य सहसंघटक तेजस राऊत  राज्य समन्वयक इक्बाल शेख, प्रतिबिंब प्रतिष्ठानचे सचिव दिपक नलावडे ,राज्य कार्यकारिणी सदस्य अमोल पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपसचिव अजिंक्य स्वामी , पुणे जिल्हाध्यक्ष गणेश हुबे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष प्रशांत साळुंके हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes