+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule26 Jun 24 person by visibility 399 categoryराजकीय
कोल्हापूर : देशभरातील ग्राहकांना स्मार्ट मीटरद्वारे विद्युत पुरवठा करण्याचे धोरण केंद्र सरकारने आणले आहे. या धोरणाच्या अनुषंगाने राज्यात स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्यासाठी सर्वेक्षण झाले होते. याद्वारे हे मीटर बसवण्यासाठी तब्बल 27 हजार कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे. प्रिपेड मीटरच्या माध्यमातून आगाऊ पैसे भरून घेण्याचे धोरण बनवून महावितरणचे खाजगीरण करण्याचा डाव असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.

याविरोधात आप ने मुंबई येथील आझाद मैदानावर आक्रोश आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचे नियोजन प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके, उपाध्यक्ष धनंजय शिंदे आणि विजय कुंभार करत असून, आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई राज्य समितीच्या पदाधिकाऱ्यांसह बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. उद्यापासून या आंदोलनाला सुरुवात होणार असून राज्यभरातील हजारो कार्यकर्ते यामध्ये सामील होण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. 

विद्युत कायदा, 2003 प्रमाणे मीटर विकत घ्यायचे का नाही हे ठरवण्याचा अधिकार ग्राहकाचा आहे. स्मार्ट मीटरचा आर्थिक ताण ग्राहकांवर पडू देणार नाही असे महावितरणचे म्हणणे आहे. परंतु या मीटरचा खर्च छुप्या पद्धतीने बिलातून वसुल करण्याचा डाव महावितरण आहेत. 

वास्तविक बघता स्मार्ट मीटरची किंमत व जोडणी खर्च सहा हजार तीनशेच्या वर असण्याचे कारण नाही. परंतु बारा हजार रुपये प्रति मीटर इतक्या रकमेचे टेंडर मंजूर करण्यात आले आहे. महावितरण मोठ्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव या अडून आखला जात आहे.

ग्राहकांनी विजेचा वापर केल्यानंतर देयक वसुल करण्याची पद्धत असताना प्रिपेड मीटरचा आग्रह का धरला जात आहे. महावितरण ने आधुनिकीकरण केल्यास ग्राहकांचे वीज दर कमी होणे अपेक्षित आहे, परंतु स्मार्ट मीटर योजनेमुळे ग्राहांना कोणताही आर्थिक फायदा होणार नाही. उलट ग्राहकांची लूट करण्यासाठीच स्मार्ट प्रिपेडचा घाट घातला जात असल्याचा आरोप आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला.