+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule25 Jul 24 person by visibility 246 categoryमहानगरपालिका
 कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये सतत पडणाऱ्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे येणाऱ्या पूर परिस्थीतीचा व आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा दिवसरात्र रस्त्यावर उतरुन काम करत आहे. आज सकाळी शहरात पूराचे पाणी आलेल्या कसबा बावडा उलपेमळा, नागाळा पार्क येथील विन्स हॉस्पीटल परिसर, पंचगंगा तालीम येथील जामदार क्लब परिसर, कदमवाडी, जाधववाडी, मुक्त सैनिक वसाहत परिसर व चित्रदुर्ग मठातील स्थलांतरीत नागरीकांच्या ठिकाणी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी जाऊन पाहणी केली. 

यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उप-आयुक्त पंडीत पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, सहा.आयुक्त संजय सरनाईक, उप-शहर अभियंता रमेश कांबळे, सतिश फप्पे, आर.के.पाटील उपस्थित होते.

  यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी पाणी आलेल्या भागातील नागरीकांनी सतर्क राहून महापालिकेने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. नागरकांनी पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने पाणी येण्यापुर्वीच स्थलांतरीत व्हावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच चित्रदुर्ग मठातील स्थलांतरीत नागरीकांची भेट घेऊन त्यांना महापालिकेकडून मिळत असलेल्या सेवा सुविधांची माहिती घेतली. यावेळी मठातील स्थलांतरीत नागरीकांनी महापालिकेच्यावतीने नाष्टा, चहा व जेवण वेळेवर मिळत नसून जेवणाबद्दल प्रशासकांना तक्रार केली. त्यामुळे या ठिकाणी जेवणाचा चांगला दर्जा दयावा, संबंधीत अधिका-यांनी जेवणाची तपासणी करावी अशा सूचना दिल्या. त्याचबरोबर महापालिकेच्यावतीने आरोग्य विभागाची वैद्यकीय टिम दैनंदिन तीन वेळा या मठामध्ये येऊन वैद्यकीय तपासणी करुन नागरीकांना मोफत औषधे देत असल्याचे नागरीकांनी सांगितले.

▪️वादळाने पडलेली झाडे उठावाचे काम रात्रभर सुरु

 शहरामध्ये कालपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने मुख्य रस्त्यावर मोठी झाडे कोसळली होती. ही सर्व झाडे बागा खाते व अग्शिमन विभागाच्या जवानांच्या सहाय्याने रात्रभर कटिग करण्याचे काम सुरु होते. दिवसा रहदारीस अडथळा ठरणारी हि सर्व झाडे रात्रीच कटिक करुन त्याचा उठाव करुन रस्ता वाहतूकीस खुला करुन दिला आहे.