+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule12 Jul 24 person by visibility 409 categoryराजकीय
मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा अपेक्षेप्रमाणे विजय झाला. मात्र आश्चर्य म्हणजे जिंकण्यासाठी आवश्यक मते नसतानाही ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या संबंधाच्या जोरावर विजय मिळवला. काँग्रेसचे सात ते आठ मते फुटल्याचे निकालातून समोर येत आहे.

विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी आज, शुक्रवारी मतदान झाले तसेच मतमोजणी देखील पार पडली. विधानसभेच्या २८८पैकी २७४ सदस्यांनी निवडणुकीत मतदान केले. अंतिम निकालानुसार भाजपचे परिणय फुके, पंकजा मुंडे, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, शिंदे गटाचे कृपाल तुमाने, भावना गवळी आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर विजयी झाले.

 ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर सर्वपक्षीय संबंधाच्या जोरावर आमदार बनले. काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव यांनीही विजय संपादन केला. मात्र काँग्रेस आमदारांची ७ ते ८ मते फुटल्याची चर्चा आहे.