कोल्हापुरात दीड तासांच्या थरारानंतर बिबट्या जेरबंद
schedule11 Nov 25 person by visibility 64 categoryराज्य
कोल्हापूर : विवेकानंद कॉलेज परिसरात सुमारे दीड तासाच्या प्रयत्नानंतर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडण्यात यश मिळवले. त्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात आले.
विवेकानंद कॉलेज परिसरात आणि हॉटेल वूडलँडच्या आसपास बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या बिबट्याने हॉटेल वूडलँडच्या गार्डनमध्ये माळीवर त्याने अचानक हल्ला केला. माळी किरकोळ जखमी झाला. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावरही बिबट्याने झडप घातली. तसेच एका पोलीस कर्मचाऱ्यांशी इजा पोहोचवली.
या मोहिमेदरम्यान वनरक्षक ओंकार काटकर यांच्यावर बिबट्याने हल्ला केला, मात्र त्यांना किरकोळ दुखापत झाली असून ते सध्या सुरक्षित आहेत. वनविभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी अतिशय संयम आणि कौशल्य दाखवत ही संपूर्ण कारवाई पूर्ण केली. बिबट्याला पकडल्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले .