कोल्हापुरातील निवृत्ती चौक ते उभा मारुती चौक रस्ता 30 नोव्हेंबर पर्यंत वाहतुकीस बंद
schedule11 Nov 25 person by visibility 52 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र.1 गांधी मैदान कार्यक्षेत्रातील अपना बैंक ते उभा मारुती चौक रस्तेवर स्ट्रॉर्मवॉटर ड्रेनेजचे काम दि.30 नोव्हेंबर 2025 पर्यंत करण्यात येणार आहे.
गांधी मैदान येथे वारंवार साचणारे पाणी निर्गत करणेसाठी हे स्ट्रॉर्मवाटर ड्रेनेजचे काम सुरु आहे. त्यामुळे सदरचा रस्ता या कालावधीत वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. नागरीकांची गैरसोय होवु नये याकरीता निवृत्ती चौक ते उभा मारुती चौक या मुख्य रस्तेवरील वाहतूक दिनांक 11 ते 30 नोव्हेंबर 2025 अखेर अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
तरी याबाबत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे