+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule27 Jul 24 person by visibility 210 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये संततधार पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. महापालिकेची सर्व यंत्रणा रात्रदिवस काम करत असून पूर बाधीत क्षेत्रातील पंचगंगा तालीम, सुतारवाडा, सीता कॉलनी, शाहूपुरी, बापट कॅम्प, रमणमळा, उलपेमळा, कसबा बावड या परिसरातील 609 नागरीकांचे आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये 152 कुटुंबातील 301 पुरुष, 308 महिला व 100 मुलांचा समावेश आहे. तर आजअखर महापालिकेच्या निवारा केंद्रात 220 कुटुंबातील 443 पुरुष, 440 महिला व 148 मुले असे 883 नागरीकांचे स्थलांतर झाले आहे.

 या सर्व निवारा केंद्रातील स्थलांतरीत कुटुंबांना महापालिकेच्यावतीने नाष्टा, चहा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने वैद्यकीय टिम दैनंदिन तीन वेळा या मठामध्ये येऊन वैद्यकीय तपासणी करुन नागरीकांना मोफत औषधे देत आहे. तर शहरातील 154 जणावरांचे राजाराम साखर कारखाना, दसरा चौक ग्राऊंड, उतरेश्वरपेठ ग,गो,जाधव हॉल, कसबा बावडा पोल्ट्री ऑफिस या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांना चा-याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

 तसेच पूरबाधीत क्षेत्रातील नागरीकांनी महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील वॉर रूममध्ये 0231-2542601, 2545473 या दोन फोन नंबर्सवर मदतीसाठी व माहितीसाठी संपक्र साधावा असे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आवाहन केले आहे.