+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule20 Jul 24 person by visibility 300 categoryसामाजिक
▪️नागाव, निगवे, वसगडे येथे शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून निगवे, वसगडे आणि नागाव येथे दूध व्यावसायिक व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न झाल्या. हे दोन्ही व्यवसाय अधिक किफायतशीर पद्धतीने करण्यासाठी या कार्यशाळा शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.  
    
दुध व्यवसाय व ऊस उत्पादन हा ग्रामीण अर्थकारणाचा कणा आहे. दूध व्यवसाय व्यवस्थापन आधुनिक पद्धतीने केल्यास या व्यवसायातून अधिक उत्पन्न मिळवणे शक्य आहे. या व्यवसायांच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्याना अधिक माहिती व मार्गदर्शन मिळावे यासाठी या मेळाव्यांचे आयोजन केले असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी सांगितले. निगवे, वसगडे आणि नागाव येथे झालेल्या या तीन कार्यशाळामध्ये ६०० हून अधिक शेतकरी उपस्थित होते

   नागाव येथील कार्यशाळेत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ जे बी पाटील यांनी दूध व्यवसाय व्यवस्थापनाविषयी सूक्ष्म मार्गदर्शन केले. संतुलित आहार,सुनियोजित व्यवस्थापन हे दूध व्यवसाय यशस्वी करण्याचे मर्म असल्याचे त्यांनी सांगितले. दूध व्यवसाय व्यवस्थापनातील बारकावे सांगताना संमिश्र संतुलित आहार आणि सुनियोजित व्यवस्थापन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

 निगवे येथे झालेल्या कार्यशाळेत कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय अस्वले यांनी मार्गदर्शन करताना जातिवंत जनावरांची पैदास केल्यास दुग्ध व्यवसाय फायदेशीर ठरेल असे प्रतिपादन केले. जनावरांची खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, गोठा व्यवस्थापन व चारा व्यवस्थापन, गाभण जनावरांची काळजी विविध आजारांचे व्यवस्थापन याबाबत डॉ. अस्वले यांनी यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले. 

  वसगडे येथे झालेल्या कार्यक्रमात किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठीची चतु:सूत्री विशद केली. दुग्ध व्यवसाय अधिक फायदेशीर ठरण्यासाठी मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन त्यांनी केले. वैरण व खाद्य व्यवस्थापन, रोग जंतूंचे निर्मूलन आणि जनावरांचे माज व्यवस्थापन याबाबत त्यांनी माहिती दिली. शेतकऱ्याने स्वतः दुधाची विक्री केली तसेच दुधापासून विविध पदार्थांची निर्मिती व विक्री केली तर त्याला अधिक फायदा होऊ शकेल. त्यामुळे दुग्ध पदार्थ निर्मीतीवरही भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

▪️सर्वसामान्याशी नाळ जोडलेले आमदार
नागाव येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार ऋतुराज पाटील यांनी शेतकऱ्यामध्ये बसून डॉ. जे. बी. पाटील यांचे संपूर्ण मार्गदर्शन ऐकले. यातून शेतकऱ्यासाठी व त्यांचे उत्पन्न वाढीसाठी असलेली त्यांची तळमळ दिसून आली. सर्वसामान्याशी नाळ जोडलेल्या या आमदाराच्या साध्या वागण्याबाबत शेतकरी बांधवामधून समाधान व्यक्त होत होते.

▪️निगवे येथील कार्यक्रमाला बिद्रीचे माजी संचालक श्रीपती बापू पाटील, संचालक आर. एस.कांबळे, संचालक संभाजी पाटील (कावणे), जी .जी. पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष डी.एस.ढगे, बी. एस.पाटील, वसंत पाटील, आर.एस.कांबळे पोपट कांजर, प्रवीण पाटील, आनंदा कापसे, डी.आर.पाटील, रणजीत चौगले, नागाव येथे सरपंच सतपाल मगदूम,विजय नाईक, संजय नाईक,आर के राणगे,धोंडीराम सरनाईक,राहुल कोराने,अनिल तेली,आनंदा कराडे,धोंडीराम सरनाईक ,कपिल सरनाईक, वसगडे येथील कार्यक्रमाला माजी जि. प. सदस्य शोभा राजमाने, सुनील पाटील, सचिन पाटील, डॉ. शीतल पाटील, रावसाहेब पाटील, संजय नवले यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.