अंगणवाडी सेविकांचा प्रलंबित मागण्यासाठी सोमवार, 14 जुलै रोजी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा
schedule13 Jul 25 person by visibility 226 categoryसामाजिक

कोल्हापूर : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासनाने सरकारी कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी तसेच गेल्या वर्षी जाहीर केलेली मानधन वाढ तात्काळ मिळावी तसेच एफ आर एस च्या कामाची सक्ती करू नये या एफ आर एस च्या कामातून सेविकांचे मुक्तता करावी तसेच अंगणवाडीच्या कामाची वेळ बदलून ती पूर्वीप्रमाणे करावी या व इतर मागण्यांसाठी सोमवार दिनांक 14 जुलै 2025 रोजी दुपारी बारा वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा आयोजित केला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पोषण ट्रॅक्टर मधून आहार वाटप करताना एफ आर एस म्हणजे चेहरा जुळवणे या कामाची सक्ती केली जात आहे बऱ्याच ठिकाणी मोबाईल ला नेटवर्क नसल्याने तसेच अनेक पालकांनी आपल्या मोबाईल आधार कार्ड ला लिंक केले नसल्याने अनेक ठिकाणी अडचणी येत आहेत तसेच हे एफ आर एस म्हणजे चेहरा जुळवणे हे न झाल्यास या लाभार्थ्यांना आहार मिळणार नाही याबाबतीत वरिष्ठाकडे तक्रार करून सुद्धा कोणतीही दखल घेतली नाही याचे निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस उद्या सोमवार रोजी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढून सदर कामावर इथून पुढे बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर करणार आहोत
तरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसनी उद्या सोमवार दिनांक 14 जुलै रोजी सकाळी ठीक अकरा वाजता महावीर गार्डन येथे जमावे व तेथून जिल्हा परिषद वर जाणारे मोर्चा मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड आप्पा पाटील व कॉम्रेड जयश्री पाटील यांनी केले आहे.