राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर ४ जणांची नियुक्ती, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचा समावेश
schedule13 Jul 25 person by visibility 204 categoryदेश

नवी दिल्ली : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून उज्ज्वल निकमांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. उज्ज्वल निकम यांच्यासोबतच सी. सदानंदन मस्ते, हर्षवर्धन श्रृंगला आणि डॉ. मीनाक्षी जैन यांनाही राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर संधी मिळाली आहे.
▪️उज्ज्वल निकम: मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून प्रसिद्ध असलेले निकम यांनी अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये योगदान दिले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.
▪️हर्षवर्धन श्रृंगला: माजी परराष्ट्र सचिव असलेले श्रृंगला यांनी अमेरिका, बांगलादेश आणि थायलंडमध्ये राजदूत म्हणून काम केले. 2023 मध्ये भारताच्या G20 अध्यक्षतेचे मुख्य समन्वयक म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
▪️सी. सदानंदन मास्टर: केरळचे शिक्षक आणि भाजप सदस्य असलेले सदानंदन यांनी 2021 च्या विधानसभा निवडणुकीत भाग घेतला. 1994 मध्ये राजकीय हिंसाचारात त्यांचे दोन्ही पाय गमवले, तरी त्यांनी स्वतःला सावरले.
▪️मीनाक्षी जैन: प्रसिद्ध इतिहासकार असलेल्या जैन यांनी दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमध्ये इतिहासाचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे.