+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात : समीर देशपांडे; करवीर नगर वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त
schedule14 Oct 24 person by visibility 188 categoryराज्य
कोल्हापूर : खासगी दुचाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-GT दि. 15 ऑक्टोबर पर्यंत संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दुचाकी नोंदणी मालिका MH09-GV दि. 16 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज दि. 16 व 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3 या वेळेत खिडकी क्र. 10 येथे स्वीकारण्यात येतील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.

वाहन नोंदणी क्रमांकाची मागणी करतेवेळी खालील सूचनांचे पालन करावयाचे आहे. पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मूळ रकमेचा डी.डी. (धनाकर्ष) जोडणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पे ऑर्डर अर्जासोबत देऊ नये. धनाकर्ष काढताना SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRAS या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्वीकारला जाणार नाही.पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचा एकच धनाकर्ष दि. 16 व 17 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 2 या कालावधीत कार्यालयात सादर करावा. 18 ऑक्टोबर 2024 रोजी सायं. 5 वाजल्यानंतर पसंतीच्या क्रमांकाच्या व (लिलावात गेलेल्या क्रमांकाच्या) याद्या प्रसिध्द केल्या जातील.

 लिलावात जादा रकमेचा एकच डिडी स्वीकारण्यात येईल. धनाकर्षाच्या मागे अर्जदाराने नाव, मोटार वाहनाचा प्रकार, मागणी केलेला नोंदणी क्रमांक व मोबाईल क्रमांक लिहीणे आवश्यक आहे. एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्या क्रमांकाचा लिलाव करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराकडून दि. 18 ऑक्टोबर रोजी जादा रकमेचा स्वतंत्र धनाकर्ष बंद लिफाफ्यात सकाळी 9.45 ते दुपारी 2.30 या कालावधीत जमा करणे बंधनकारक राहील. एका पेक्षा जास्त अर्ज असलेल्या नोंदणी क्रमांकाचा लिलाव दि. 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येईल. फक्त अर्जदार व प्राधिकृत प्रतिनिधी यांनाच लिलावास उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येईल.

 लिलावास येताना अर्जदाराने ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहणार असेल तर त्याच्याकडे प्राधिकार पत्रासह ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. आकर्षक क्रमांकाची मागणी करताना आधारला संलग्न असलेलाच मोबाईल नंबर व पत्ता अर्जावर लिहावा, अर्जावर मोबाईल नंबर लिहला नसल्यास आपला कोणताही हक्क आकर्षक क्रमांकावर राहणार नाही. तसेच यादी मध्ये आपले नाव आले तरी आपल्यास आकर्षक क्रमांक मिळणार नाही. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येत नाही, नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 180 दिवसाच्या आत नोंदणी करुन नाही घेतली तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक अपोआप रद्द होईल व शुल्क सरकार जमा होईल. 

विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नाही. नियमित रोखीने पावत्या 22 ऑक्टोबर 2024 पासून सुरु करण्यात येतील. तसेच पावती झाल्याचा संदेश आपल्या भ्रमणध्वनी वर प्राप्त झाल्यावरच पावती घेण्यासाठी हजर राहून पावती तपासून घ्यावी. वैयक्तिक अर्ज व आकर्षक क्रमांकाच्या फी चा धनादेश वाहनधारकाने फी ची खात्री करुनच जमा करावा. जरी नजर चुकीने धनादेश घेतला गेला व नंतर पडताळणी करताना कार्यालयाच्या निदर्शनास आले तर लिलाव प्रक्रियेत अर्ज बाद करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. भोर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.