+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात : समीर देशपांडे; करवीर नगर वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त
schedule07 Aug 24 person by visibility 334 categoryक्रीडा
नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची दावेदार मानली जाणारी भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट
 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो गटात कुस्तीचा अंतिम सामना खेळणार होती, परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर आता विनेश फोगटची प्रकृती खालावल्यामुळे स्पोर्ट्स व्हिलेजमधील पॉलीक्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, तिच्या प्रकृतीविषयी अद्याप तरी कोणतीही गंभीर बाब नसल्याचीही माहिती मिळाली आहे. तसेच तिला लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या स्पर्धेत सुवर्णपदकापर्यंत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनून विनेशने मंगळवारी रात्री इतिहास रचला होता. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एका भारतीय प्रशिक्षकाने सांगितले की, "आज सकाळी त्याचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. नियम याची परवानगी देत नाहीत आणि त्याला अपात्र ठरवण्यात आले आहे."


विनेश फोगटचे वजन 100 ग्रॅमने वाढले होते, ज्यामुळे तिला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आले होते. सर्वांना विनेशकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. काल रात्री त्याने उपांत्य फेरीत शानदार विजयाची नोंद केली होती. चमकदार कामगिरी करणाऱ्या विनेश फोगटकडून सुवर्णपदकाच्या पूर्ण अपेक्षा होत्या. 

नियमानुसार अपात्र ठरल्यानंतर आता कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कोणतेही पदक जिंकता येणार नाही. याचा अर्थ अंतिम फेरीत पोहोचूनही विनेशला पदकाविना मायदेशी परतावे लागणार आहे.