+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule24 Jul 24 person by visibility 364 categoryसामाजिक
🔴 महापालिका प्रशासनाला सूचना : चित्रदुर्ग मठात नागरिकांशी साधला संवाद

कोल्हापूर : शहरातील पुराचा धोका प्रत्येक वर्षी वाढत आहे. यामुळे पूरबाधित नागरिकांसाठी सुसज्ज निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करून शासनास सादर करा अशा सूचना आमदार जयश्री जाधव यांनी आज महापालिका प्रशासनास दिल्या. निवारा केंद्रास निधी मिळावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार जयश्री जाधव यांनी सांगितले.

पुराची पातळी धोका पातळीकडे जात असल्याने शहरातील विविध भागांतील पूरग्रस्तांसाठी ठिकठिकाणी ३१ निवारा केंद्रे महापालिकेने सज्ज केली आहेत. ही सर्व केंद्रामध्ये नागरिकांना उत्तम सुविधा देण्याचे काम महापालिका प्रशासन करीत आहे. आज सुतारवाड्यातून चित्रदुर्ग मठात आलेल्या स्थलांतरित केलेल्या नागरिकांशी आमदार जयश्री जाधव यांनी संवाद साधला. या संकटकाळात पूरबाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगीतले व धीर दिला.

आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, प्रत्येक वर्षी पुरामुळे नागरिकांना स्थलांतरित करावे लागते. यासाठी महापालिका प्रशासनाकडे आरक्षित असलेल्या जागांवरती निवारा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा आणि तो शासनास सादर करावा. या प्रस्तावास मंजुरी मिळावी आणि निधी मिळावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू.

 पूररेषेतील नागरिकांनी घरामध्ये पाणी येण्याची वाट न पाहता निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित व्हावे आणि महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन आमदार जयश्री जाधव यांनी केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपशहर अभियंता आर. के. पाटील आदी उपस्थित होते.