+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule20 Jul 24 person by visibility 191 categoryशैक्षणिक
  कोल्हापूर : बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्त्रोत केंद्र व ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ जुलै २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता राजर्षी शाहू सिनेट हॉल, मुख्य इमारत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे ‘ अवेअरनेस प्रोग्राम ऑन स्कोपस अँड निम्बस’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले आहे.


      विद्यापीठातील सर्व शिक्षक व पी. एच. डी नोंदणी केलेले सर्व संशोधक याकरिता सदर कार्यक्रम आयोजित केला आहे. सदर कार्यशाळेमध्ये गिरीश कुलकर्णी हे ‘निम्बस’ या वेब स्केल डिस्कवरी सेवेविषयी व श्रीमती ऐश्वर्या नायल, एल्सवियर, नवी दिल्ली या ‘स्कोपस’या डेटाबेस विषयी तज्ञ व्याख्यान देणार असून कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थान भूषविणार मा. प्र- कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाचा शिवाजी विद्यापीठातील सर्व संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे .

 कार्यक्रमाचे संयोजक डॉ. धनंजय सुतार प्र. संचालक, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्त्रोत केंद्र व डॉ. सचिनकुमार पाटील, विभागप्रमुख, ग्रंथालय आणि माहितीशास्त्र अधिविभाग यांनी केले आहे.