+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule26 Jul 24 person by visibility 349 categoryसामाजिक
कोल्हापूर : पुराच्या पाण्यामुळे बापट कॅम्पमधील कुंभार बांधवांना तयार गणेश मूर्ती ठेवण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे या मूर्तिकारांसाठी मार्केट समितीची जागा उपलब्ध करून देत निवारा शेड, मोठ्या मूर्ती नेण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली यांसह त्यांना हवे असणारी सर्व मदत तत्काळ उपलब्ध करण्याच्या सूचना आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. महापुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यास इंडिया आघाडी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, या शब्दांत त्यांनी महापुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांनाही आश्वस्त केले.
बापट कॅम्पमध्ये पुराचे पाणी आले असून, अनेक मूर्तिकारांच्या कार्यशाळेत पाणी शिरल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. आमदार सतेज पाटील यांच्यासह आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांनी शुक्रवारी सकाळी या भागाची पाहणी करत पूरग्रस्तांना धीर दिला.

 गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरे पाण्यात गेल्यामुळे ज्या मूर्तिकारांचे काम ठप्प झाले आहे, त्यांना तातडीने मार्केट यार्डमधील गोडाऊन उपलब्ध करून द्यावे, असे आदेश आमदार सतेज पाटील यांनी महापालिका व मार्केट कमिटीचे अधिकारी यांना दिले. शासनाकडून मिळणारी मदत व त्यासाठीचे पंचनामे त्वरित करण्यात येतील, असेही त्यांनीही सांगितले. यावेळी त्यांनी दुचाकी व पायी फिरत परिस्थितीची पाहणी केली.

 यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, जलअभियंता नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता हर्षजित घाटगे, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक राजू लाटकर, शारंगधर देशमुख, प्रकाश कुंभार-सरवडेकर, तौफिक मुलानी, राजू डकरे, प्रकाश तारळेकर, दत्ताजीराव वारके, कुमार अहुजा उपस्थित होते.

▪️ अधिकारी धारेवर
बापट कॅम्प भागातील मूर्ती आणि नागरिकांचे स्थलांतर केले नसल्याने सतेज पाटील यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांनी तत्काळ मार्केट समिती या ठिकाणी मूर्ती ठेवण्यास जागा उपलब्ध करून देण्यासह जाधववाडी हायस्कूल येथे नागरिकांच्या स्थलांतराची सोय करण्यात आल्याची माहिती दिली.

▪️ या भागांचीही केली पाहणी
सतेज पाटील यांनी कदमवाडी येथे पूर पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. खासदार शाहू छत्रपती यांच्यासोबत आंबेवाडी गावाला भेट देऊन पुराचा आढावा घेतला. येथील विद्यामंदिरमध्ये अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी माजी सरपंच मारुती पाटील यांनी रखडलेले पुनर्वसन मार्गी लावण्यासह बावडा, वडणगे, राजपूतवाडी, रेडे डोह याठिकाणी रस्त्याखालून पुराचे पाणी पास होण्यासाठी मोठ्या कमानी बांधण्याची माणगी केली. यावेळी विजय देवणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील उपस्थित होते.